फतेपूर ते तिवसा तहसीलवर शेतकऱ्यांची १५ किमी पदयात्रा
अमरावती, 15 सप्टेंबर (हिं.स.)। कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचा एल्गार; तहसील कार्यालयावर ठिय्या देत निवेदन अपुऱ्या पावसामुळे खरीप पिकांवर निर्माण झालेल्या संकटाकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनश
फतेपूर ते तिवसा तहसीलवर शेतकऱ्यांची १५ किमी पदयात्रा


अमरावती, 15 सप्टेंबर (हिं.स.)।

कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचा एल्गार; तहसील कार्यालयावर ठिय्या देत निवेदन

अपुऱ्या पावसामुळे खरीप पिकांवर निर्माण झालेल्या संकटाकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मंगळवारी (१५ सप्टेंबर) फतेपूर (शिवणगाव) ते तिवसा तहसील कार्यालय अशी सुमारे १५ किलोमीटरची शेतकरी पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत तिवसा तालुक्यातील शेतकरी, ट्रॅक्टरमालक तसेच प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.पदयात्रेची सुरुवात शिवणगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी स्व. मनोज पांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदानाने करण्यात आली. त्यानंतर शेतकरी व कार्यकर्त्यांनी फतेपूर येथून तिवसाच्या दिशेने पायदळ मार्गक्रमण केले. विविध मागण्यांच्या घोषणा देत शासनाचे लक्ष वेधण्यात आले.तिवसा तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर कराअपुऱ्या पावसामुळे सोयाबीन, तूर, कापूस यांसह खरीप पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून तिवसा तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व आवश्यक सवलती द्याव्यात, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.मनोज पांडे कुटुंबाला मदतीची मागणीशिवणगाव येथील शेतकरी स्व. मनोज पांडे यांनी आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यांच्या कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.महावितरणच्या समस्यांवरही आक्रमक भूमिकाशेतीपंपांना वीजपुरवठा करणाऱ्या नादुरुस्त डीपींची तातडीने दुरुस्ती करावी, वारंवार बिघाड होणाऱ्या डीपींची क्षमता वाढवावी, खाली आलेल्या विद्युत तारांची दुरुस्ती करावी तसेच जीर्ण व धोकादायक विद्युत खांब बदलण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.सुमारे १५ किलोमीटरचा पायदळ प्रवास करून पदयात्रा तिवसा तहसील कार्यालयावर पोहोचली. यावेळी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करीत विविध समस्या प्रशासनासमोर मांडल्या. त्यानंतर तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केवळ आश्वासन म्हणून न पाहता शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, दुष्काळी परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून आर्थिक मदत, सुरळीत वीजपुरवठा आणि आवश्यक सवलती द्याव्यात, अशी मागणी प्रहारच्या वतीने करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande