परभणी - आरपी हॉस्पिटलच्या अत्याधुनिक लॅप्रोस्कोपी प्रणालीचे उद्घाटन
परभणी, 15 सप्टेंबर (हिं.स.)। पाथरी रस्त्यावरील आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अत्याधुनिक लॅप्रोस्कोपी आणि लेसर मशीनचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या अत्याधुनिक उपक
Q


परभणी, 15 सप्टेंबर (हिं.स.)।

पाथरी रस्त्यावरील आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अत्याधुनिक लॅप्रोस्कोपी आणि लेसर मशीनचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या अत्याधुनिक उपकरणांमुळे आता परभणीसह मराठवाड्यातील रुग्णांना कमी खर्चात दुर्बीणीद्वारे पोटाच्या सर्व बिनाटाक्याच्या शस्त्रक्रिया करता येतील. तसेच लेसरद्वारे मूळव्याध, भगंदर आणि संडासच्या ठिकाणापासून होणारे रक्तस्त्राव बिना टाक्याचे आँपरेशन लेसरद्वारे करून रुग्णांना एका दिवसात घरी जाता येणार असल्याचे हॉस्पिटलचे संस्थापक आमदार डॉ. राहुल पाटील यांनी सांगितले. तर सर्वसामान्य नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन स्वत:ची वेदनापासून सुटका करून घ्यावी आणि निरोगी आयुष्य जगावे, असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी केले आहे. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. अमीर तडवी, डॉ. विद्या नाटकर, डॉ. चांडक, डॉ. शिवानी नाईक यांच्यासह हॉस्पिटलचे सर्व अधिकारी, डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande