
मुंबई, 15 सप्टेंबर (हिं.स.) - वर्धा जिल्ह्यातील आर्वी नगरपरिषदेला व्यापारी संकुल बांधण्यासाठी ६ हजार २४०.३० चौ.मी. शासकीय जमीन विनामूल्य देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
आर्वी नगर परिषदेला व्यापारी संकुलाच्या उभारणीसाठी मौजा आर्वी येथील ६ हजार ५१९ चौ. मी. शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली होती. आर्वी नगरपरिषद ही क वर्ग नगरपरिषद असल्याने, तिच्याकडे उत्पन्नाची मर्यादित साधने आहेत. त्यामुळे नगरपरिषदेची आर्थिक स्थिती व शहराचा सर्वांगीण विकास लक्षात घेता विशेष बाब म्हणून या जमिनीसाठी द्यावे लागणारे अधिमूल्य माफ करण्यात यावे या विनंतीचा प्रस्ताव आज मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला. त्यानुसार आर्वी नगरपरिषदेला ही जमीन विनामूल्य देण्यास मान्यता देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी