NSE IPO : सबस्क्रिप्शन बिड करण्यापूर्वी पाहा या ५ गोष्टी
नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडने (एनएसई) आपल्या पहिल्या सार्वजनिक भागविक्रीसाठी ₹१ दर्शनी मूल्य असलेल्या प्रति इक्विटी शेअरसाठी ₹१,७०० ते ₹१,७८५ चा किंमतपट्टा निश्चित केला आहे. कंपनीचा हा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी १७ सप्टेंबर २०२६ रोजी उघडेल आ
nse


नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडने (एनएसई) आपल्या पहिल्या सार्वजनिक भागविक्रीसाठी ₹१ दर्शनी मूल्य असलेल्या प्रति इक्विटी शेअरसाठी ₹१,७०० ते ₹१,७८५ चा किंमतपट्टा निश्चित केला आहे. कंपनीचा हा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी १७ सप्टेंबर २०२६ रोजी उघडेल आणि २१ सप्टेंबर २०२६ रोजी बंद होईल.

१. नफा क्षमता : NSE आपल्या उत्पन्नातील निम्म्याहून अधिक रक्कम नफ्यात रूपांतरित करते

गुंतवणूकदारांनी सर्वप्रथम NSEच्या नफा क्षमतेकडे लक्ष द्यावे. FY26 मध्ये NSEचा PAT मार्जिन 55.1 टक्के होता. जगातील प्रमुख सूचीबद्ध एक्स्चेंजमध्ये NSEचा हा मार्जिन तिसऱ्या क्रमांकावर आहे. नुकत्याच संपलेल्या तिमाहीत हा PAT मार्जिन सुमारे 59 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. यावरून एक्स्चेंजच्या व्यवसायातील मजबूत ऑपरेटिंग लेव्हरेज दिसून येते. व्यवहारांचे प्रमाण वाढल्यास नफ्यात त्यापेक्षा वेगाने वाढ होऊ शकते.

२. वाढ : उच्च नफा टिकाऊ व्यवसायवाढीवर आधारित आहे का?

केवळ उच्च मार्जिन असणे म्हणजे गुंतवणुकीची संधी आकर्षक आहे असे नाही. FY22 ते FY26 या काळात NSEच्या एकूण उत्पन्नात 20.5 टक्के CAGR नोंदवला गेला. यावरून नफ्यासोबत व्यवसायाचीही ठोस वाढ झाल्याचे दिसते. भारतातील गुंतवणूकदारांची संख्या वाढत असताना, आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतवणुकीचा वाटा वाढत असताना आणि भांडवली बाजाराचा विस्तार होत असताना ही वाढ भविष्यातही कायम राहील का, हे गुंतवणूकदारांनी तपासणे आवश्यक आहे.

३. परतावा आणि बॅलन्स शीट : कर्जाशिवाय 33 टक्के ROE

FY26 मध्ये NSEने 33 टक्के Return on Equity (ROE) नोंदवला. जगातील प्रमुख एक्स्चेंजमध्ये हा परतावा आघाडीच्या स्तरावर आहे. विशेष म्हणजे हा परतावा कर्जमुक्त बॅलन्स शीटवर मिळवला आहे. NSEकडे सुमारे ₹68,198 कोटींची ट्रेझरी गुंतवणूक देखील होती. त्यामुळे IPOची किंमत किंवा मूल्यांकन पाहण्याबरोबरच कंपनीची बॅलन्स शीट आणि भांडवलाचा कार्यक्षम वापर याकडेही गुंतवणूकदारांनी लक्ष द्यावे.

४. भागधारकांना परतावा : डिव्हिडंड पेआउटमध्ये मोठी वाढ

NSEचा भागधारकांना मिळणारा परतावाही महत्त्वाचा आहे. FY24 मधील ₹18 वरून FY26 मध्ये प्रति शेअर डिव्हिडंड ₹35 झाला. याच काळात डिव्हिडंड पेआउट रेशो 54 टक्क्यांवरून 84 टक्क्यांपर्यंत वाढला. म्हणजेच कंपनीच्या नफ्यातील मोठा हिस्सा भागधारकांना परत केला जात आहे. मात्र, भविष्यातील विस्तार आणि गुंतवणुकीच्या गरजा लक्षात घेता एवढा उच्च पेआउट कायम राहू शकेल का, हेही तपासणे आवश्यक आहे.

५. सर्वात मोठा धोका : NSEचा नफा डेरिव्हेटिव्हजवर किती अवलंबून आहे?

IPOमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कदाचित हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा तपासणे गरजेचे आहे. NSEच्या व्यवहारातून मिळणाऱ्या उत्पन्नातील मोठा हिस्सा इक्विटी डेरिव्हेटिव्हज, विशेषतः ऑप्शन्समधून येतो. त्यामुळे ट्रेडिंग व्हॉल्यूम, गुंतवणूकदारांचे वर्तन आणि डेरिव्हेटिव्हज संदर्भातील भविष्यातील नियामक बदल यांचा NSEच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांनी स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा — आजचा NSEचा उच्च नफा हा व्यवसायाच्या मूलभूत ताकदीमुळे आहे की डेरिव्हेटिव्हजमधील असामान्य वाढीचाही त्यात मोठा वाटा आहे?

थोडक्यात

NSE IPOच्या बाजारात उतरताना उच्च PAT मार्जिन, मजबूत व्यवसाय वाढ, 33 टक्के ROE, कर्जमुक्त बॅलन्स शीट आणि वाढता भागधारक परतावा अशी मजबूत आर्थिक स्थिती घेऊन येत आहे. मात्र, IPOमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेताना केवळ नफा पाहणे पुरेसे नाही. NSEच्या सध्याच्या नफ्याची टिकाऊपणा आणि विशेषतः डेरिव्हेटिव्हजवरील अवलंबित्वाच्या तुलनेत IPOचे मूल्यांकन किती योग्य आहे, हे तपासणे अधिक महत्त्वाचे ठरेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande