भारतीय वेगवान गोलंदाज मुकेश कुमार काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळणार
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर (हिं.स.)भारतीय वेगवान गोलंदाज मुकेश कुमार २०२६ च्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळणार आहे. त्याने नॉटिंगहॅमशायरसोबत दोन सामन्यांचा करार केला असून, यासोबतच तो पहिल्यांदाच इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये खेळणार आहे. तो नुकताच दुलीप ट
मुकेश कुमार


नवी दिल्ली, 15 सप्टेंबर (हिं.स.)भारतीय वेगवान गोलंदाज मुकेश कुमार २०२६ च्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळणार आहे. त्याने नॉटिंगहॅमशायरसोबत दोन सामन्यांचा करार केला असून, यासोबतच तो पहिल्यांदाच इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये खेळणार आहे. तो नुकताच दुलीप ट्रॉफीमध्ये खेळला होता. तो विजेतेपद पटकावणाऱ्या पूर्व विभागाच्या संघाचा भाग होता. दक्षिण विभागाविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने ६२ धावांत तीन बळी घेतले होते.

१५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ससेक्सविरुद्धच्या सामन्यात मुकेश खेळण्याची शक्यता आहे. त्यानंतर नॉटिंगहॅमशायर २४ सप्टेंबरला यॉर्कशायरविरुद्ध खेळेल आणि या सामन्याने त्याचा करार संपेल. आपल्या काउंटी कारकिर्दीबद्दल तो म्हणाला, इंग्लंडमध्ये येऊन काउंटी क्रिकेटमध्ये स्वतःला आजमावण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. येथे असताना, मला नॉटिंगहॅमशायरच्या यशात शक्य तितके योगदान द्यायचे आहे आणि मी प्रशिक्षक व माझ्या नवीन सहकाऱ्यांसोबत काम करण्यास उत्सुक आहे. इंग्लंडमध्ये येणे हे नेहमीच एक चांगले आव्हान असते आणि नवीन परिस्थितीत नवीन संघासाठी खेळण्याच्या संधीबद्दल मी उत्साहित आहे.

मुकेशने आतापर्यंत ६० प्रथम-श्रेणी सामने खेळले असून २३३ बळी घेतले आहेत. त्याने एका डावात १० वेळा पाच बळी घेतले आहेत आणि एकदा एका सामन्यात १० बळीही घेतले आहेत. त्याने भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळले असून, या सामन्यांमध्ये सात बळी घेतले आहेत. तो शेवटचा २०२४ मध्ये भारतासाठी खेळला होता आणि तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर आहे. त्याने भारतीय संघासाठी एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत.

नॉटिंगहॅमशायर सध्या काउंटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत एकूण १८५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या हंगामात अनेक भारतीय क्रिकेटपटू काउंटी क्रिकेट खेळले आहेत. यामध्ये कुलदीप यादव (यॉर्कशायर), मानव सुथार (वॉरविकशायर), आकिब नबी (सरे), युझवेंद्र चहल (नॉर्थम्प्टनशायर), जयदेव उनाडकट (ससेक्स), मयंक अग्रवाल (डरहॅम), राहुल चहर आणि महिपाल लोमरोर (सरे) यांचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande