मालवाहू ट्रक पलटी, दोघे गंभीर जखमी -जिंतूर - औंढा रस्त्यावरील घटना
परभणी, 16 सप्टेंबर (हिं.स.)। जालना येथून फरशी घेऊन नांदेडकडे जाणारे अवजड वाहनाचा वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाले. या अपघातात वाहनातील दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना जिंतूर-औंढा महामार्गावर पुंगळा परिसरात घडली. खंडू संभाजी दासरे (वय ४०) रा
Q


परभणी, 16 सप्टेंबर (हिं.स.)।

जालना येथून फरशी घेऊन नांदेडकडे जाणारे अवजड वाहनाचा वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाले. या अपघातात वाहनातील दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना जिंतूर-औंढा महामार्गावर पुंगळा परिसरात घडली.

खंडू संभाजी दासरे (वय ४०) रा. तरोडानाका, नांदेड आणि विश्वनाथ मधुकर जोगदंड (वय ३२) रा. शिरडशहापूर, ता. औंढा नागनाथ अशी जखमींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जालना येथून फरशी घेऊन जाणारे अवजड वाहन जिंतूरमार्गे औंढ्याकडे जात होते. पुंगळापाटी परिसरात एका वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन पलटी झाले. अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात आणि विजय राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी मुंडे यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. खंडू दासरे यांच्या कंबरेसह पायाला व शरीराच्या इतर भागांवर दुखापत झाली आहे. तर विश्वनाथ जोगदंड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, ते रक्तबंबाळ अवस्थेत होते. दोघांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande