
परभणी, 16 सप्टेंबर (हिं.स.)।
जिल्ह्यात माहे जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात पावसाची मोठ्या प्रमाणात तूट आहे. कमी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. पाऊस नाही दुसरीकडे उन्हाळ्यासारख कडक उन पडत, यामुळे पिके करपून जात आहे. यामुळे शासनाने तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना ५० हजार हेक्टरी अनुदान द्यावे व दुष्काळी योजना जाहीर कराव्यात, अशी मागणी लासिना येथील सामाजिक कार्यकर्ते पवन जाधव यांनी केली आहे.
यंदा पावसाळ्यात पावसाने सुरुवातीपासूनच हुलकावणी दिली आहे पावसाळा सुरू होऊन तीन महिने कालावधी संपला तरी सरासरी पेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला आहे यामुळे शेतकरी हतबल झाला आहे एकीकडे पाऊस नाही दुसरीकडे उन्हाळ्यासारख कडक उन यामुळे पिके करपून जात आहे डोळ्यासमोर पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा व ५० हजार हेक्टरी मदत द्यावी, अशी मागणी लासीना येथील सामाजिक कार्यकर्ते पवन जाधव यांनी केली आहे. निसर्गाच्या चक्रामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान होत आहे यामुळे पिक विमा कंपन्यांच्या मोबदला सरसकट शेतकऱ्यांना दिला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis