धाराशिव येथे दुष्काळस्थितीविषयी संवाद व चर्चासत्र संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 16 सप्टेंबर (हिं.स.)।दुष्काळाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन आगामी काळातील उपाययोजनांबाबत कृती आराखडा ठरविण्यासाठी जल व भूमी व्यवस्थापन विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उपपरिसर धाराशिव आणि ज्ञान प्रबोधिनी केंद्र हराळ
अ


छत्रपती संभाजीनगर, 16 सप्टेंबर (हिं.स.)।दुष्काळाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन आगामी काळातील उपाययोजनांबाबत कृती आराखडा ठरविण्यासाठी जल व भूमी व्यवस्थापन विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उपपरिसर धाराशिव आणि ज्ञान प्रबोधिनी केंद्र हराळी यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय संवाद व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

या चर्चासत्रात धाराशिव जिल्ह्यात विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या १९ स्वयंसेवी संस्थांमधील २८ प्रतिनिधींनी सहभाग घेतला. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या सद्यस्थितीचा विविध अंगांनी आढावा घेताना त्याचे शेती, पाणी, उपजीविका, पर्यावरण व सामाजिक जीवनावर होणारे परिणाम याबाबत चर्चा करण्यात आली. सहभागी संस्थांनी दुष्काळी परिस्थितीत केलेल्या कामांचे अनुभव तसेच स्थानिक पातळीवर जाणवणाऱ्या अडचणी व संभाव्य उपाययोजना मांडल्या.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी ऑनलाइन माध्यमातून मार्गदर्शन केले. तसेच धाराशिव तालुक्याच्या तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी चर्चासत्रास उपस्थित राहून शासकीय यंत्रणेच्या अभ्यासातून समोर आलेल्या दुष्काळस्थितीची माहिती दिली. तसेच आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेल्या उपाययोजना आणि प्रशासनाची भूमिका याबाबत उपस्थितांशी संवाद साधला.

दुष्काळासारख्या व्यापक संकटाला सामोरे जाण्यासाठी केवळ एका संस्थेच्या किंवा एका यंत्रणेच्या प्रयत्नांपेक्षा समाज , स्वयंसेवी संस्था, विद्यापीठे, शासकीय यंत्रणा यांनी परस्पर समन्वयाने एकत्रितपणे काम करण्याची गरज या चर्चेत अधोरेखित झाली.या संवादातून पुढील काळात स्थानिक गरजांवर आधारित उपाययोजना, उपक्रम व कृती आराखडे विकसित करण्यासाठी अशा प्रकारची चर्चासत्रे सातत्याने आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपपरिसर धाराशिव चे संचालक डॉ .आर.बी.चौगुले सर, ज्ञान प्रबोधिनी केंद्र हराळी चे प्रमुख अभिजित कापरे, विभाग प्रमुख डॉ. नितीन पाटील, KVK तुळजापूर येथील डॉ. सचिन सूर्यवंशी, TISS संचालक डॉ बाळ राक्षे, प्राध्यापक डॉ संपत काळे, डॉ गणेश चादरे, WOTR संस्था प्रमुख अभिजित कवठेकर, SSP संस्थेच्या देवकन्या जगदाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande