
परभणी, 16 सप्टेंबर (हिं.स.)।
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (दि. १७) सकाळी ९ वाजता राजगोपालचारी उद्यान परभणी येथे ऊर्जा, महिला व बालविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
तत्पूर्वी त्याच ठिकाणी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रम समारंभाला येताना राष्ट्रीय पोषाख परिधान करून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे. प्रशासकीय इमारत येथे ध्वजारोहण समारंभ मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी साजेसात वाजता प्रशासकीय इमारत येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम अपर जिल्हाधिकारी शोभादेवी जाधव यांच्या हस्ते पार पडणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम समारंभाला येताना अधिकारी-कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पोषाख परिधान करून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis