पाकिस्तानमध्ये इंधनाचे दर गगनाला भिडले; शहबाज शरीफ सरकारची चिंता वाढली
इस्लामाबाद , 16 सप्टेंबर (हिं.स.)।पाकिस्तानमध्ये ऊर्जा संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून, त्यासोबतच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अडचणीही वाढत आहेत. पाकिस्तानमध्ये तेल आणि गॅसच्या किमती गगनाला भिडत आहेत. मध्य पूर्वेत अमेरिका आणि इराणमध्ये
पाकिस्तानमध्ये इंधनाचे दर गगनाला भिडले; शहबाज शरीफ सरकारची चिंता वाढली


इस्लामाबाद , 16 सप्टेंबर (हिं.स.)।पाकिस्तानमध्ये ऊर्जा संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून, त्यासोबतच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अडचणीही वाढत आहेत. पाकिस्तानमध्ये तेल आणि गॅसच्या किमती गगनाला भिडत आहेत.

मध्य पूर्वेत अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे तेलाच्या किमती वाढत असून, इंधन महाग होत आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकार पेट्रोलचा वापर कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांचा विचार करत आहे. मध्य पूर्वेतील परिस्थिती अधिक बिघडल्यामुळे पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

पाकिस्तानमध्ये मंगळवारी रात्री पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ४.१० पाकिस्तानी रुपये, तर हाय-स्पीड डिझेलच्या (एचएसडी) दरात प्रतिलिटर ६.४१ पाकिस्तानी रुपयांची वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर ३८४.३४ पाकिस्तानी रुपये, तर हाय-स्पीड डिझेलचा दर प्रतिलिटर ४१५.८३ पाकिस्तानी रुपये झाला आहे.

पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत असल्याने पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अडचणी वाढत आहेत. इंधनाच्या दरातील मोठ्या वाढीमुळे पाकिस्तान आणखी किती काळ जागतिक तेल संकटाचा परिणाम सहन करू शकेल, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

पाकिस्तानचे हवामान बदल मंत्री मुसादिक मलिक यांनी सांगितले, “सरकार आपल्या इंधन सवलत योजनेद्वारे दरवाढीतील काही भार स्वतः उचलण्याचा प्रयत्न करत आहे.”

पाकिस्तान सरकारच्या या योजनेअंतर्गत मोटारसायकलस्वारांना आठवड्याला पाच लिटरपर्यंत अनुदानित दरात पेट्रोल मिळणार आहे. तर कार मालकांना दर दहा दिवसांनी १० लिटरपर्यंत पेट्रोलवर सवलत दिली जाणार आहे.

मुसादिक मलिक यांनी सांगितले की, या मदतीमुळे इंधनाच्या दरवाढीची संपूर्ण भरपाई होणार नसली, तरी पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या जितका भार सहन करू शकते, तितकीच जास्तीत जास्त मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande