
छत्रपती संभाजीनगर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत सर्वरोग मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले ऍॅडव्हान्स मेडिसिटी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलवदीक्षा हेल्थ एज्युकेशन अँड चॅरिटेबल डेव्हलपमेंट फाउंडेशन
यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, तसेच आजारांचे वेळेत निदान होऊन योग्य उपचार मिळावेत, या सामाजिक भावनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा उपक्रम म्हणजे निरोगी समाजाच्या आरोग्यदायी जीवनासाठी एक संकल्प असल्याचे पालकमंत्री शिरसाट म्हणाले
------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis