लातूर नगराध्यक्षांचा पर्यावरणपूरक उपक्रम; गणेश मंडळांसाठी निर्माल्य संकलनाचे विशेष वाहन
लातूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। निर्माल्य नाल्यात टाकू नका; नगर परिषदेच्या वाहनातच जमा करा — निर्माल्यापासून तयार होणार सेंद्रिय खत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेश मंडळांनी गणेशमूर्तीच्या पूजेनंतर निर्माण होणारे फुल, दुर्वा, हार, वाती व इ
स्वप्नील व्हत्ते


लातूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)।

निर्माल्य नाल्यात टाकू नका; नगर परिषदेच्या वाहनातच जमा करा — निर्माल्यापासून तयार होणार सेंद्रिय खत

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेश मंडळांनी गणेशमूर्तीच्या पूजेनंतर निर्माण होणारे फुल, दुर्वा, हार, वाती व इतर निर्माल्य नाल्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये, असे आवाहन अहमदपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष अॅड. स्वप्नील व्हत्ते यांनी केले आहे.

शहरातील सर्व गणेश मंडळांसाठी अहमदपूर नगर परिषदेच्या वतीने निर्माल्य संकलनासाठी विशेष वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. हे वाहन प्रत्येक गणेश मंडळापर्यंत पोहोचून मंडळाकडील निर्माल्य संकलित करणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांच्या अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी निर्माल्य रस्त्यावर, नाल्यात किंवा इतरत्र न टाकता नगर परिषदेच्या विशेष वाहनातच जमा करावे.

संकलित करण्यात आलेल्या निर्माल्यावर योग्य पद्धतीने प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराची स्वच्छता राखण्यासोबतच निर्माल्याचा पुनर्वापर होऊन पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे.

गणेशोत्सव हा श्रद्धेचा आणि उत्साहाचा सण असून, या काळात शहर स्वच्छ व पर्यावरणपूरक ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यामुळे अहमदपूर शहरातील सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्ष व सदस्यांनी नगर परिषदेच्या या उपक्रमास सहकार्य करून निर्माल्य नाल्यात न टाकता विशेष वाहनातच द्यावे, असे आवाहन नगराध्यक्ष अॅड. स्वप्नील व्हत्ते यांनी केले आहे.

निर्माल्य संकलन वाहनासाठी विशाल कदम मो नं ७३५०७२७१७४ यावर संपर्क साधावा असे देखील सांगण्यात आले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande