छ. संभाजीनगरात ८५५ किलो मिठाईचा साठा जप्त
छत्रपती संभाजीनगर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने जालन्यात दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापे टाकले. छत्रपती संभाजीनगरच्या आर.पी. रोडवरील आस्थापनातून मैसूर पाक, हलवा व शेव
छ. संभाजीनगरात ८५५ किलो मिठाईचा साठा जप्त


छत्रपती संभाजीनगर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने जालन्यात दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापे टाकले. छत्रपती संभाजीनगरच्या आर.पी. रोडवरील आस्थापनातून मैसूर पाक, हलवा व शेवचे नमुने घेण्यात आले. अस्वच्छ साठवणूक व विनापरवाना व्यवसाय आढळल्याने ७९७ किलो, १ लाख ८ हजार ६९० रुपये किमतीचा साठा जप्त करून आस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच मस्तगड येथील लक्ष्मी स्वीट्समधील ५८ किलो स्वीट मावा लेबलदोष व अस्वच्छ साठवणुकीमुळे जप्त करून नष्ट करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande