सौदी अरेबियासाठी अमेरिकेचा ‘लेव्हल-३’ प्रवास इशारा; नागरिकांना सावधगिरीचा सल्ला
वॉशिंग्टन, 16 सप्टेंबर (हिं.स.)। पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी इशारा जारी केला आहे. अमेरिकी परराष्ट्र विभागाने सौदी अरेबियाच्या प्रवासाबाबत ‘लेव्हल-३’ प्रवास सल्ला जार
सौदी अरेबियासाठी अमेरिकेचा ‘लेव्हल-३’ प्रवास इशारा; नागरिकांना सावधगिरीचा सल्ला


वॉशिंग्टन, 16 सप्टेंबर (हिं.स.)। पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी इशारा जारी केला आहे. अमेरिकी परराष्ट्र विभागाने सौदी अरेबियाच्या प्रवासाबाबत ‘लेव्हल-३’ प्रवास सल्ला जारी करत नागरिकांना सौदी अरेबियाच्या प्रवासाचा पुन्हा विचार करण्याचे आवाहन केले आहे. ट्रम्प प्रशासनाकडून जारी करण्यात आलेला हा इशारा इराणसमर्थित हौथी बंडखोरांकडून सौदी अरेबियावर सातत्याने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देण्यात आला आहे.

अमेरिकेच्या मते, या प्रदेशातील वाढता तणाव आणि संभाव्य हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियातील अमेरिकी हितसंबंधांना लक्ष्य केले जाऊ शकते. अलीकडे मक्का शहराच्या दक्षिणेकडे हौथी बंडखोरांनी पाठवलेला एक ड्रोन सौदीच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हवेतच नष्ट केला होता. या घटनेनंतर सुरक्षेबाबतच्या चिंता अधिक वाढल्या आहेत.सौदी अरेबियातील व्यावसायिक विमानसेवा अद्याप सुरू असली तरी सुरक्षेच्या कारणास्तव त्यात मोठ्या प्रमाणावर अडथळे आणि व्यत्यय निर्माण होत आहेत.

याशिवाय सौदी अरेबिया आणि येमेनच्या सीमेलगतच्या भागांसाठी अमेरिकेने सर्वाधिक कडक ‘लेव्हल-४ — प्रवास करू नका’ असा इशारा जारी केला आहे. येमेनमधील सशस्त्र गटांकडून सीमावर्ती भागांवर ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि रॉकेटच्या माध्यमातून सातत्याने हल्ले केले जात असल्याने या भागातील नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

अमेरिकी सरकारी कर्मचाऱ्यांना येमेन सीमेपासून २० मैलांच्या परिसरात जाण्यावर कठोर निर्बंध आहेत. तसेच कतीफ, जिझान, असीर आणि नजरान या भागांमध्ये जाण्यासाठी विशेष परवानगी घेणे आवश्यक आहे.

अमेरिकी प्रवास सल्ल्यामध्ये नागरिकांना आणखी काही महत्त्वपूर्ण सुरक्षाविषयक इशारेही देण्यात आले आहेत. विमानतळे, लष्करी तळ, ऊर्जा प्रकल्प, हॉटेल्स, वाहतूक व्यवस्था आणि गर्दीची ठिकाणे येथे दहशतवादी हल्ल्यांचा धोका कायम असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अमेरिकी सरकारने आपल्या नागरिकांना अशा ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande