सोलापूर जिल्ह्यात १.७० लाख मृत मतदार आढळले
मतदार यादीतून नावे वगळण्यापूर्वी मृत्यू प्रमाणपत्र तपासण्याच्या सूचना सोलापूर, १६ सप्टेंबर (हिं.स.) : मतदार यादी पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत सोलापूर जिल्ह्यात तब्बल १ लाख ७० हजार ६९६ मतदार मृत आढळून आले आहेत. या मृत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळत
voter  matdar


मतदार यादीतून नावे वगळण्यापूर्वी मृत्यू प्रमाणपत्र तपासण्याच्या सूचना

सोलापूर, १६ सप्टेंबर (हिं.स.) : मतदार यादी पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत सोलापूर जिल्ह्यात तब्बल १ लाख ७० हजार ६९६ मतदार मृत आढळून आले आहेत. या मृत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळताना संबंधितांचे मृत्यू प्रमाणपत्र तपासण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.

मतदार यादीत बदल करणे अथवा मतदाराचे नाव वगळण्याच्या प्रक्रियेत नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः मोठ्या संख्येने म्हणजेच ‘बल्क’मध्ये अर्ज स्वीकारण्यास मनाई करण्यात आली असून, फॉर्म क्रमांक ७ आणि ८ च्या गैरवापराला प्रतिबंध करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर प्राप्त होणाऱ्या दावे आणि हरकतींवर सुनावणी घेण्यात येणार आहे. या सुनावणीसाठी संबंधित मतदारांना नोटिसा बजावण्यात येणार असून, त्यासाठी उपलब्ध विविध माध्यमांचा प्रभावी वापर केला जाणार आहे.

संबंधित मतदारांपर्यंत सुनावणीची माहिती वेळेत पोहोचावी यासाठी आवश्यकतेनुसार व्हॉट्सॲप संदेशाचाही वापर केला जाणार आहे. त्यामुळे मतदार यादीतील नाव वगळणे किंवा त्यामध्ये दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि नियमानुसार करण्यावर निवडणूक यंत्रणेचा भर राहणार आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande