सोलापूर-आरटीओच्या वाहन तपासणीला आता बॉडी कॅमेऱ्याची नजर
सोलापूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)वाहन तपासणीच्या कारवाईत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) मोटार वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांसाठी १५ बॉडी वेअर कॅमेरे उपलब्ध करून दिले आहेत. रस्त्यावर वाहन तपासणी करताना अ
सोलापूर-आरटीओच्या वाहन तपासणीला आता बॉडी कॅमेऱ्याची नजर


सोलापूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)वाहन तपासणीच्या कारवाईत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) मोटार वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांसाठी १५ बॉडी वेअर कॅमेरे उपलब्ध करून दिले आहेत. रस्त्यावर वाहन तपासणी करताना अधिकारी आणि वाहनचालकांमध्ये होणारे वाद, गैरवर्तन तसेच कारवाईसंदर्भातील तक्रारींना आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे. वाहन तपासणीदरम्यान कागदपत्रांची पडताळणी, दंडात्मक कारवाई तसेच वाहनचालकांशी होणारा संवाद याचे ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग बॉडी कॅमेऱ्याद्वारे केले जाणार आहे. त्यामुळे तपासणीदरम्यान नेमकी कोणती कारवाई झाली, याचा डिजिटल पुरावा उपलब्ध राहणार आहे. अधिकारी किंवा वाहनचालकाकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्यास या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून घटनेची वस्तुस्थिती तपासणे प्रशासनाला शक्य होणार आहे. त्यामुळे वाहन तपासणी प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यासोबतच अधिकारी आणि वाहनचालक यांच्यातील वाद आणि गैरसमज कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande