शी जिनपिंग यांची ब्रिक्स परिषदेदरम्यान प्रकृती बिघडली? चीनच्या विरोधी पक्षनेत्याचा मोठा दावा
बीजिंग, 17 सप्टेंबर (हिं.स.)। चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबाबत चीनच्या विरोधी पक्ष असलेल्या चायना डेमोक्रसी पार्टी (सीडीपी) चे अध्यक्ष वानजुन शी यांनी मोठा दावा केला आहे. शी यांनी सोशल मीडिया मंच ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे क
शी जिनपिंग यांची ब्रिक्स परिषदेदरम्यान प्रकृती बिघडली? चीनच्या विरोधी पक्षनेत्याचा मोठा दावा


बीजिंग, 17 सप्टेंबर (हिं.स.)। चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबाबत चीनच्या विरोधी पक्ष असलेल्या चायना डेमोक्रसी पार्टी (सीडीपी) चे अध्यक्ष वानजुन शी यांनी मोठा दावा केला आहे. शी यांनी सोशल मीडिया मंच ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारतात झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांना चीनमध्ये परत आणून बीजिंगमधील ३०१ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्या या दाव्याला चीन सरकार किंवा सरकारी माध्यमांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

वानजुन शी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, अशा चर्चा सुरू आहेत की भारतात असताना राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग बेशुद्ध पडले आणि त्यांची प्रकृती अचानक खालावली. मात्र, त्यांच्यासोबत असलेल्या वैद्यकीय पथकाने तातडीने त्यांच्यावर उपचार केले. त्यानंतर जिनपिंग यांनी भारताचा दौरा मध्येच आटोपून विशेष विमानाने चीनला परतण्याचा निर्णय घेतला.

पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, विशेष विमान बीजिंग विमानतळावर पोहोचल्यानंतर मोठ्या संख्येने अधिकाऱ्यांनी शी जिनपिंग यांचे स्वागत केले नाही आणि कोणताही स्वागत समारंभही आयोजित करण्यात आला नव्हता. त्याऐवजी, ‘शी जिनपिंग यांना थेट बीजिंगमधील ३०१ रुग्णालयात नेण्यासाठी लष्करी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला.’

वानजुन यांनी पुढे दावा केला की, रुग्णालयातील तज्ज्ञांच्या पथकाने जिनपिंग यांना इस्केमिक स्ट्रोक झाल्याचे निदान केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, “उड्डाणादरम्यान शस्त्रक्रियेची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने वैद्यकीय पथकाला शी जिनपिंग यांचे प्राण वाचवण्यासाठी केवळ रूढीवादी उपचार करावे लागले.”

वानजुन यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, जिनपिंग यांच्या प्रकृतीबाबत बीजिंगमध्ये चिंता कायम आहे. तसेच, त्यांच्या आगामी अमेरिका दौऱ्याबाबतही अद्याप परिस्थिती स्पष्ट झालेली नाही.मात्र, वानजुन शी यांनी केलेल्या या कोणत्याही दाव्याला चीन सरकार किंवा सरकारी माध्यमांकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande