छ. संभाजीनगर-मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
छत्रपती संभाजीनगर, 17 सप्टेंबर (हिं.स.) | मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.
अ


छत्रपती संभाजीनगर, 17 सप्टेंबर (हिं.स.) | मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संगिता राठोड, उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) संगीता सानप, उपजिल्हाधिकारी (रोहोयो) रुपेश शिंगारे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, अपर तहसिलदार उमेश पाटील, तहसिलदार पल्लवी लिगदे, रुपा चित्रक यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी –कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना भेटून शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande