
नवी दिल्ली, १७ सप्टेंबर (हि.स.) । देशांतर्गत शेअर बाजारात आज सुरुवातीच्या व्यवहारात चढ-उतार सुरू असतानाही तेजीचा कल पाहायला मिळत आहे. आज बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली होती. मात्र, बाजार उघडल्यानंतर खरेदीदारांनी जोरदार लिवाली केल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी काही वेळातच सावरत हिरव्या निशाणावर प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा विक्रीचा दबाव निर्माण झाल्याने दोन्ही निर्देशांकांच्या तेजीला काहीसा ब्रेक लागला. सकाळी १० वाजेपर्यंत सेन्सेक्स ०.२२ टक्के आणि निफ्टी ०.३४ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होते.
मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स आज १५३.८३ अंक म्हणजेच ०.२१ टक्क्यांच्या घसरणीसह ७४,१८२.६२ अंकांवर उघडला. बाजार सुरू होताच खरेदीदारांनी लिवालीचा जोर वाढवला. त्यामुळे काही वेळातच सेन्सेक्सने उसळी घेत हिरव्या निशाणावर प्रवेश केला. सातत्याने सुरू असलेल्या खरेदीच्या जोरावर सुरुवातीच्या २० मिनिटांतच सेन्सेक्सने आपल्या प्रारंभिक पातळीपेक्षा ३५० अंकांहून अधिक वाढ नोंदवत ७४,५३७.६० अंकांची पातळी गाठली.यानंतर नफावसुलीला सुरुवात झाल्याने सेन्सेक्सच्या तेजीवर दबाव आला. बाजारात सुरू असलेल्या खरेदी-विक्रीच्या चढ-उतारादरम्यान सकाळी १० वाजेपर्यंत सेन्सेक्स १६५.३२ अंक म्हणजेच ०.२२ टक्क्यांच्या वाढीसह ७४,५०१.७७ अंकांवर व्यवहार करत होता.
सेन्सेक्सप्रमाणेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा (एनएसई) निफ्टीही आज २२.३५ अंक म्हणजेच ०.१० टक्क्यांच्या घसरणीसह २३,१९५.२५ अंकांवर उघडला. बाजार सुरू झाल्यानंतर खरेदीदारांनी जोरदार लिवाली केल्याने निफ्टीच्या हालचालींना वेग आला. सातत्याने झालेल्या खरेदीमुळे काही वेळातच निफ्टीने आपल्या प्रारंभिक पातळीपेक्षा १०५ अंकांहून अधिक उसळी घेत २३,३०३.८५ अंकांची पातळी गाठली.मात्र, ही तेजी फार काळ टिकू शकली नाही. या पातळीवर नफावसुली सुरू झाल्याने निफ्टीच्या तेजीवरही दबाव निर्माण झाला. बाजारात सुरू असलेल्या खरेदी-विक्रीच्या चढ-उतारादरम्यान सकाळी १० वाजेपर्यंत निफ्टी ७७.८० अंक म्हणजेच ०.३४ टक्क्यांच्या वाढीसह २३,२९५.४० अंकांवर व्यवहार करत होता.
आजच्या आतापर्यंतच्या व्यवहारात शेअर बाजारातील २,८०१ समभागांमध्ये सक्रिय व्यवहार सुरू होते. त्यापैकी २,१९० समभाग हिरव्या निशाणावर नफ्यात व्यवहार करत होते, तर ६११ समभाग लाल निशाणावर घसरणीसह व्यवहार करत होते. सेन्सेक्समध्ये समाविष्ट ३० समभागांपैकी २० समभाग खरेदीच्या जोरावर हिरव्या निशाणावर होते, तर १० समभाग विक्रीच्या दबावामुळे लाल निशाणावर व्यवहार करत होते.निफ्टीमध्ये समाविष्ट ५० समभागांपैकी ३५ समभाग हिरव्या निशाणावर, तर १५ समभाग लाल निशाणावर व्यवहार करताना दिसत होते.
सकाळी १० वाजेपर्यंतच्या व्यवहारात शेअर बाजारातील प्रमुख कंपन्यांमध्ये एटरनल, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि एचडीएफसी लाइफ यांच्या समभागांमध्ये २.१६ टक्क्यांपासून १.५० टक्क्यांपर्यंतची वाढ नोंदवली जात होती.दुसरीकडे, ओएनजीसी, एचसीएल टेक्नॉलॉजीज, एचडीएफसी बँक, टीसीएस आणि कोल इंडिया यांच्या समभागांमध्ये १.४९ टक्क्यांपासून ०.५२ टक्क्यांपर्यंतची घसरण नोंदवली जात होती.यापूर्वी, मागील व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच बुधवारी सेन्सेक्स ३३२.६३ अंक म्हणजेच ०.४५ टक्क्यांच्या वाढीसह ७४,३३६.४५ अंकांवर बंद झाला होता. त्याचप्रमाणे निफ्टी ९९ अंक म्हणजेच ०.४३ टक्क्यांच्या वाढीसह २३,२१७.६० अंकांवर स्थिरावला होता.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी