जर सरकारने धोका दिला, तर आम्ही मुंबई गाठणार, मनोज जरांगेंचा इशारा
बीड, 17 सप्टेंबर (हिं.स.)। मनोज जरांगे यांनी सरकारला 90 दिवसांची मुदत दिली. 3 महिन्यात सातारा गॅझेट लागू करा. सरकारला 3 महिन्यांचा वेळ देतो. जर सरकारने धोका दिला, तर आम्ही मुंबई गाठणार, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. 58 लाख नोंदी कमी होणार ना
अ


बीड, 17 सप्टेंबर (हिं.स.)।

मनोज जरांगे यांनी सरकारला 90 दिवसांची मुदत दिली. 3 महिन्यात सातारा गॅझेट लागू करा. सरकारला 3 महिन्यांचा वेळ देतो. जर सरकारने धोका दिला, तर आम्ही मुंबई गाठणार, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. 58 लाख नोंदी कमी होणार नाही, याची खात्री द्या. नोंदी शोधण्यासाठी आम्ही माणसं देतो. शिंदे समिती काम करत नाही आणि सरकारही लक्ष देत नाही. हे आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय थांबणार नाही. ही लढाई थांबणार नाही, मी उपोषण सोडणार नाही. आम्हाला आश्वासन दिलं, तरी आंदोलन सुरु राहणार, असं मनोज जरांगे म्हणाले. तसेच सातारा गॅझेट लागू करण्यासाठी तीन महिने देतो, असंही मनोज जरांगेंनी सांगितले. मराठा समाजाला खुन्नस देणं चांगलं नाही. राधाकृष्ण विखे चुकत असले तरी त्यांच्यावर प्रेम करा. एकनाथ शिंदेंवरही प्रेम करु पण आता नाही. मंत्र्यांनी टीका केली तर आम्ही गप्प बसणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. मराठा समाजाला खुन्नस देणं चांगलं नाही. चर्चा न करणारे आज चर्चेसाठी आले की नाही?, आरक्षणापेक्षा समाजाची इज्जत महत्वाची आहे, असंही मनोज जरांगेंनी सांगितले.

58 लाख नोंदी सापडल्या, त्यातली एकही कमी व्हायला नको- मनोज जरांगे

सातारा गॅझेट बाबत 1100 पानांचा अहवाल आहे. याबाबत 3 ते 4 महिन्यात आम्ही कारवाई करू. अभ्यासासाठी यात वेळ हवा आहे. हैद्राबाद गॅझेटबाबत याचिका सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. यामध्ये हैद्राबाद गॅझेटच्या जीआरला स्थगिती मिळणार नाही. याची काळजी घेतली जाईल, असं राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले. यावर मराठा समाजालाच का डावललं जातंय? सातारा, कोल्हापूर, पुणे, औंधचं गॅझेटियर लागू करा, असं मनोज जरांगेंनी सांगितले. जीआर काढून गॅझेटियरची अंमलबजावणी करावी लागेल. 58 लाख नोंदी सापडल्या. त्यातली एकही कमी व्हायला नको. नोंदी कमी करणार नाही, याची लेखी हमी द्यावी, असं मनोज जरांगे म्हणाले.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande