मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, आंदोलन सुरुच राहणार; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर निर्णय
- समर्थकांना माघारी येण्याचे आवाहन बीड, 17 सप्टेंबर (हिं.स.)। अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी सरकारचे शिष्टमंडळ बीडमधील पाटोदा येथे दाखल झाले. यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे, मंत्
अ


- समर्थकांना माघारी येण्याचे आवाहन

बीड, 17 सप्टेंबर (हिं.स.)।

अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी सरकारचे शिष्टमंडळ बीडमधील पाटोदा येथे दाखल झाले.

यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड, आमदार सुरेश धस, बीड जिल्हाधिकारी यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत संवाद साधला. यानंतर आज सकाळी वाजता पत्रकार परिषद घेऊन सरकारचे शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा झाली.

मी आज उपोषण स्थगित करतो, मात्र आंदोलन सुरुच राहणार, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. तसेच मुंबईत गेलेल्या 1 लाख 07 हजार समर्थकांनी माघारी यावं, असं आवाहन देखील मनोज जरांगेंनी केले.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande