नेपाळ पुरातील बेपत्तांचा आकडा ६,१५० वर; ढिगाऱ्याखालून अद्याप मृतदेह बाहेर
काठमांडू, 17 सप्टेंबर (हिं.स.)। नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. या दुर्घटनेला २२ दिवस उलटूनही बेपत्ता झालेल्या नागरिकांचा शोध लागलेला नाही. दरम्यान, ढिगाऱ्याखाली गाडलेले मृतदेह अद्यापही बाहेर काढले जात
नेपाळ पुरातील बेपत्तांचा आकडा ६,१५० वर; ढिगाऱ्याखालून अद्याप मृतदेह बाहेर


काठमांडू, 17 सप्टेंबर (हिं.स.)। नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. या दुर्घटनेला २२ दिवस उलटूनही बेपत्ता झालेल्या नागरिकांचा शोध लागलेला नाही. दरम्यान, ढिगाऱ्याखाली गाडलेले मृतदेह अद्यापही बाहेर काढले जात आहेत.या आपत्तीमध्ये बेपत्ता झालेल्या नागरिकांची संख्या ६ हजारांच्या पुढे गेली आहे.

प्रभावित जिल्ह्यांमध्ये पुन्हा तपासणी केल्यानंतर बेपत्ता नागरिकांच्या यादीत आणखी सुमारे १ हजार जणांची नावे जोडण्यात आली आहेत. नेपाळने बुधवारी २६ ऑगस्टच्या पुरात बेपत्ता झालेल्या नागरिकांची संख्या ५ हजार १७९ वरून वाढवून ६ हजार १५० केली.

आपत्ती प्राधिकरणाचे प्रवक्ते शांती महत यांनी सांगितले, “आम्ही जिल्हा कार्यालयांकडून बेपत्ता नागरिकांबाबत माहिती गोळा करत होतो. तपासणीनंतर आकडेवारी अद्ययावत करण्यात आली आहे.”

नेपाळमध्ये आतापर्यंत एकूण १ हजार ४०३ जणांचा मृत्यू झाला असून ६ हजार १५० जण बेपत्ता आहेत. तर तिबेटमध्ये ४३ जणांचा मृत्यू झाला असून ५१९ जण बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नेपाळ आणि तिबेटमध्ये मिळून एकूण १ हजार ४४६ जणांचा मृत्यू झाला असून किमान ६ हजार ६६९ जण अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्या नागरिकांमध्ये सुमारे १८९ भारतीयांचाही समावेश आहे.

नेपाळमध्ये पूर आला, त्यावेळी सुमारे १२ जलविद्युत प्रकल्पांचे काम सुरू होते. पुरानंतर या प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये हजारो कामगार अडकले. आपत्ती घडल्यापासूनच मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.

चिलिमे येथे भारतीय लष्करातील विशेष पथक आणि नेपाळच्या बचाव पथकाने भूमिगत वीजगृहापर्यंत पोहोचल्यानंतर पाच मृतदेह बाहेर काढले.खोदकाम करणाऱ्या यंत्रांना—उत्खनक आणि चाकावरील लोडरला—पुढे जाता न आल्याने बोगद्याच्या शेवटच्या भागातील मलबा हाताने हटवण्यात आला. या ठिकाणी सहा कर्मचारी अडकले असल्याचा अंदाज होता. त्यापैकी पाच जणांचे मृतदेह सापडले असून उर्वरित एका कर्मचाऱ्याचा शोध सुरू आहे.

अप्पर त्रिशूली-१ जलविद्युत प्रकल्पात बुधवारी सुरू असलेल्या शोधमोहीमेदरम्यान नेपाळ लष्कर आणि प्रकल्पाच्या पथकाच्या संयुक्त टीमने बोगद्यातून पाच मृतदेह बाहेर काढले. रसुवाचे सहायक प्रमुख जिल्हाधिकारी ध्रुब प्रसाद अधिकारी यांनी सांगितले, “नेपाळ लष्कर आणि जलविद्युत प्रकल्पाच्या संयुक्त पथकाला शोध आणि बचाव मोहिमेदरम्यान ऑडिट-३ बोगद्यात मृतदेह आढळले.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande