अभिषेक शर्मा टी-२0 सामन्यात सर्वात जलद शतक झळकावणारा भारतीय फलंदाज
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर (हिं.स.) । टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू अभिषेक शर्माने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या स्फोटक फलंदाजीने धुमाकूळ घातला. अभिषेकने अवघ्या ३० चेंडूंमध्ये, कोणत्याही भारतीय फलंदाजाने क
अभिषेक शर्मा


अभिषेक शर्मा


नवी दिल्ली, 17 सप्टेंबर (हिं.स.) । टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू अभिषेक शर्माने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या स्फोटक फलंदाजीने धुमाकूळ घातला. अभिषेकने अवघ्या ३० चेंडूंमध्ये, कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेले सर्वात जलद टी-२० आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. त्याने आपल्या स्फोटक खेळीत १० षटकार आणि नऊ चौकार ठोकले, आणि डिसेंबर २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध माजी कर्णधार रोहित शर्माने रचलेला सर्वात जलद टी-२० आंतरराष्ट्रीय शतकाचा विक्रम मोडला.

अभिषेकचे शतक हे कसोटी खेळणाऱ्या कोणत्याही देशाविरुद्ध कोणत्याही फलंदाजाने केलेले सर्वात जलद शतक देखील आहे. भारतीय डावाच्या नवव्या षटकात एक धाव घेत त्याने आपले शतक पूर्ण केले. या खेळीमुळे अभिषेकचे टी-२० क्रिकेटमधील हे तिसरे शतक ठरले, ज्यात १२ अर्धशतकांचा समावेश आहे.

सर्वात जलद टी२० आंतरराष्ट्रीय शतकाचा विक्रम

(२7 चेंडू) - साहिल चौहान (एस्टोनिया) विरुद्ध सायप्रस (२०२४)

(२९ चेंडू) - मुहम्मद फहाद (तुर्की) विरुद्ध बल्गेरिया (२०२५)

(३० चेंडू) - अभिषेक शर्मा (भारत) विरुद्ध अफगाणिस्तान (२०२६)

(३३ चेंडू) - जॉन निकोल लॉफ्टी-ईटन (नामिबिया) विरुद्ध नेपाळ (२०२४)

(३३ चेंडू) - सिकंदर रझा (झिम्बाब्वे) विरुद्ध गांबिया (२०२४)

(३३ चेंडू) - फिन ॲलन (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध न्यूझीलंड (२०२६)

टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद शतक झळकवणारे भारतीय फलंदाज

(३० चेंडू) - अभिषेक शर्मा विरुद्ध अफगाणिस्तान (२०२६)

(३५ चेंडू) - रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका (२०१७)

(३७ चेंडू) - अभिषेक शर्मा विरुद्ध इंग्लंड (२०२५)

(४० चेंडू) - संजू सॅमसन विरुद्ध बांगलादेश (२०२४)

(४१ चेंडू) - तिलक वर्मा विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२०२४)

अभिषेकचे शतक हे टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेले सर्वात जलद शतक आहे. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता, ज्याने २०१७ मध्ये इंदूर येथे श्रीलंकेविरुद्ध ३५ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. कसोटी खेळणाऱ्या देशाच्या फलंदाजाने केलेले हे सर्वात जलद शतक देखील आहे. पण, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वात जलद शतकाचा विक्रम एस्टोनियाच्या साहिल चौहानच्या नावावर आहे. साहिलने २०२४ मध्ये सायप्रसविरुद्ध २७ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande