नोव्हाक जोकोविच ११ वर्षांनंतर चायना ओपनमध्ये खेळणार
बीजिंग, १७ सप्टेंबर (हिं.स.)सर्बियन टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने आगामी चायना ओपनमध्ये सहभागी होणार असल्याची पुष्टी केली आहे. ही एटीपी-५०० स्पर्धा २८ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान बीजिंगमध्ये होणार आहे. जोकोविच ११ वर्षांनंतर या स्पर्धेत पुनरागमन करणार
नोव्हाक जोकोविच


बीजिंग, १७ सप्टेंबर (हिं.स.)सर्बियन टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने आगामी चायना ओपनमध्ये सहभागी होणार असल्याची पुष्टी केली आहे. ही एटीपी-५०० स्पर्धा २८ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान बीजिंगमध्ये होणार आहे. जोकोविच ११ वर्षांनंतर या स्पर्धेत पुनरागमन करणार आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला यानिक सिनर आणि नुकताच यूएस ओपन विजेता ठरलेला अलेक्झांडर झ्वेरेव्ह हे देखील चायना ओपनमध्ये सहभागी होणार आहेत.

जोकोविचने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सांगितले की , मला हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे की, अनेक वर्षांनंतर मी चायना ओपन खेळण्यासाठी बीजिंगमध्ये परत येत आहे. जोकोविच म्हणाला, नॅशनल टेनिस सेंटरमध्ये तुम्हा सर्वांसमोर परत खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. हे टेनिसमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत या ठिकाणाशी संबंधित अनेक सुंदर आठवणी आणि मोठे यश आहेत.

अमेरिकन ओपनच्या पहिल्याच फेरीत मारियानो नाव्होनविरुद्ध झालेल्या अनपेक्षित पराभवानंतर जोकोविच जोरदार पुनरागमन करण्यास उत्सुक असणार आहे. या पराभवामुळेच तो तब्बल आठ वर्षांत पहिल्यांदाच एटीपी क्रमवारीतील पहिल्या दहा टेनिसपटूंच्या यादीतून बाहेर पडला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande