मोहम्मद रिझवानची NCCIA च्या समन्सविरोधात लाहोर उच्च न्यायालयात धाव
लाहोर, 17 सप्टेंबर (हिं.स.) : पाकिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद रिझवानने ''नॅशनल सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन एजन्सी''ने (NCCIA) बजावलेल्या समन्सला आव्हान देत लाहोर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गेल्या आठवड्यात या एजन्सीसमोर हजर राहिल्यानंतर
मोहम्मद रिझवान


लाहोर, 17 सप्टेंबर (हिं.स.) : पाकिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद रिझवानने 'नॅशनल सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन एजन्सी'ने (NCCIA) बजावलेल्या समन्सला आव्हान देत लाहोर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गेल्या आठवड्यात या एजन्सीसमोर हजर राहिल्यानंतर त्याला हे समन्स बजावण्यात आले होते.

इंग्लंडमधील कसोटी मालिकेत पाकिस्तानचा ३-० असा पराभव झाल्यानंतर, चौकशीसाठी NCCIA ने रिझवान आणि त्याचा सहकारी फलंदाज इमाम-उल-हक यांना बोलावले होते. एजन्सीच्या लाहोर येथील कार्यालयात हजर झाले होते आणि त्यानंतर त्यांना भरून परत करण्यासाठी अनेक पानांची प्रश्नावली देण्यात आली होती.

इमामने १५ सप्टेंबरच्या अंतिम मुदतीपूर्वी एका मध्यस्थाद्वारे आपली उत्तरे सादर केल्याचे समजते, तर रिझवानने आपल्या उत्तरात या चौकशीचे स्वरूप आणि NCCIA ची अधिकारक्षेत्राची व्याप्ती यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रिझवानने सोमवारी ही याचिका दाखल केली. आपल्यावर कोणताही विशिष्ट आरोप नसतानाही चौकशीसाठी बोलावण्याच्या एजन्सीच्या अधिकारावर त्याने यात प्रश्न उपस्थित केला आहे.

NCCIA च्या प्रश्नावलीमध्ये क्रिकेटपटूंचा प्रवास आणि आर्थिक तपशील, तसेच वैयक्तिक आणि कारकिर्दीशी संबंधित माहिती मागवण्यात आल्याचे समजते. एजन्सीची ही चौकशी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या स्वतंत्र अंतर्गत चौकशीशी संबंधित आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिस्त आणि वर्तणुकीबाबतच्या प्रसारमाध्यमांमधील वृत्तांची दखल घेत अंतर्गत शिस्तभंगाची चौकशी सुरू केल्याचे PCB ने गेल्या आठवड्यात जाहीर केले होते. या प्रकरणाचा सध्या अंतर्गत आढावा घेतला जात आहे. ही प्रक्रिया पीसीबीच्या नियमांनुसार राबवली जात असल्याचे बोर्डाने म्हटले होते.

लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून १९४ धावांनी पराभव झाल्यानंतर, पाकिस्तानच्या संघातून वगळण्यात आलेल्या आणि मायदेशी परत पाठवण्यात आलेल्या सात क्रिकेटपटूंध्ये रिझवान आणि इमाम यांचा समावेश होता. त्याआधी, पाकिस्तानला पहिल्या कसोटी सामन्यात एका डावाने आणि १०३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

त्यानंतर पीसीबीने संघात मोठे बदल केले आणि मुख्य प्रशिक्षक सरफराज अहमद व गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांनाही पदावरून हटवले. इंग्लंडला सात नवीन क्रिकेटपटू पाठवण्यात आले. यामध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण न केलेल्या पाच क्रिकेटपटूंचा समावेश होता. पाकिस्तानला एजबॅस्टन येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात आठ गडी राखून पराभव पत्करावा लागला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande