सौदी अरेबियाची क्षेपणास्त्र संरक्षण व्यवस्था अपुरी; फ्रान्स, ब्रिटनसह चार देशांकडे मदतीची मागणी
रियाध , 17 सप्टेंबर (हिं.स.)।येमेनमधील हूती बंडखोरांसोबत वाढत असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाची क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण व्यवस्था अपुरी पडत असल्याचे समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सौदी अरेबियाने फ्रान्स, ब्रिटन, पाकिस्तान
सौदी अरेबियाची क्षेपणास्त्र संरक्षण व्यवस्था अपुरी; फ्रान्स, ब्रिटनसह चार देशांकडे मदतीची मागणी


रियाध , 17 सप्टेंबर (हिं.स.)।येमेनमधील हूती बंडखोरांसोबत वाढत असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाची क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण व्यवस्था अपुरी पडत असल्याचे समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सौदी अरेबियाने फ्रान्स, ब्रिटन, पाकिस्तान आणि इजिप्तकडे हवाई संरक्षणासाठी मदत मागितली आहे.

दोन प्रादेशिक अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, हूती आणि इराणसमर्थित इतर गटांकडून होणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी सौदी अरेबिया आपल्या मित्रदेशांकडे मदत मागत आहे. सौदी अरेबियाचा प्रमुख मित्रदेश आणि शस्त्रास्त्र पुरवठादार असलेला अमेरिका स्वतः इराणसोबत सुरू असलेल्या सहा महिन्यांच्या युद्धामुळे इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांच्या तुटवड्याचा सामना करत आहे.

त्याच दिवशी हूती बंडखोरांनी मारीब प्रांतात सौदी अरेबियाचे एफ-१५ लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला. हूती प्रवक्ते याह्या सारी यांनी सांगितले की, स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेल्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राद्वारे या विमानाला लक्ष्य करण्यात आले.

हूतींनी चार मिनिटांचा एक व्हिडिओही जारी केला आहे. त्यामध्ये लढाऊ विमानाला लक्ष्य करण्यात आल्याचे, त्याच्या अवशेषांना आग लागल्याचे आणि त्यातून धूर निघत असल्याचे दृश्य दिसत आहे. अवशेषांजवळ शस्त्रधारी लढवय्येही दिसत आहेत. सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीने या दाव्यावर तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

सौदी अरेबियाने बुधवारीच हूतींवर इस्लामचे पवित्र शहर मक्का येथे ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. सौदीच्या म्हणण्यानुसार, रॉयल सौदी एअर डिफेन्सने हा ड्रोन हवेतच रोखून नष्ट केला. सौदी अरेबियाने मक्केला ‘रेड लाइन’ असल्याचे स्पष्ट केले. मात्र, हूतींनी हा आरोप खोटा असल्याचे म्हटले आहे.इराणमधील युद्धामुळे या संघर्षाला आता नवे स्वरूप मिळाले आहे. हूतींकडून लाल समुद्रातील जहाजांवर तसेच सौदी अरेबियाच्या पायाभूत सुविधांवर हल्ले केले जात आहेत. हल्ल्यानंतर सौदीची एक महत्त्वाची तेल पाइपलाइनही बंद आहे. दरम्यान, तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलरपेक्षा अधिक पातळीवर कायम आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande