'फालतू चारित्र्यहनन पुरे झाले- उद्धव ठाकरे
दिशा सालियन प्रकरणावर दिली प्रतिक्रिया छत्रपती संभाजीनगर, 17 सप्टेंबर (हिं.स.) : दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिल
अ


दिशा सालियन प्रकरणावर दिली प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर, 17 सप्टेंबर (हिं.स.) : दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपले नाव या प्रकरणाशी जोडले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

यावेळी

उद्धव ठाकरे म्हणाले की , माझेही नाव आहे. तुमचेही येईल. दुरान्वयेही संबंध नाही. ओळखपाळख नाही. किती काळ सहन करत राहणार ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचेही नाव येईल. का म्हणून नाव घेतले जात आहे ? राजकीय हेतूने हे प्रेरित आहे. आजवर आम्ही गप्प होतो परंतु, आता फालतू चारित्र्यहनन बस्स झाले. अन्यथा आम्हीही कायदेशीर मार्गाने जाऊ. आमचा त्याच्याशी काही संबंध नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, दिशा सालियन मृत्यूप्रकरणात नव्याने तपास सुरू झाल्याच्या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांच्या जबाबाच्या आधारे प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणाशी संबंधित एफआयआरमध्ये विविध व्यक्तींच्या नावांचा उल्लेख असल्याचे वृत्त आहे. त्यात आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह तसेच अभिनेता सूरज पांचोली, दिनो मोरिया आणि रिया चक्रवर्ती यांच्यासह इतरांची नावे असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, एफआयआरमध्ये नावाचा उल्लेख असणे हे स्वतःमध्ये त्या व्यक्तीविरुद्ध आरोप सिद्ध झाल्याचे दर्शवत नाही.

दिशा सालियन यांच्या मृत्यूचे प्रकरण यापूर्वीही राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहे. या प्रकरणातील आरोप, तपासाची दिशा आणि संबंधित व्यक्तींची भूमिका याबाबत अधिकृत तपास यंत्रणांकडून समोर येणारी माहिती महत्त्वाची ठरणार आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande