गणरायाच्या साक्षीने बीजसंवर्धनाचा जागर
नांदेड, 18 सप्टेंबर (हिं.स.)। पारंपरिक बियाण्यांचे जतन, जैवविविधता संवर्धन आणि शाश्वत शेतीचा संदेश देणारा सुंदर देखावा कृषि विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्र विभागाच्या पुढाकाराने साकारण्यात आला. या देखाव्यासमोर गणरायाची भक्तिमय आरती करण्यात आली. याप
Q


नांदेड, 18 सप्टेंबर (हिं.स.)।

पारंपरिक बियाण्यांचे जतन, जैवविविधता संवर्धन आणि शाश्वत शेतीचा संदेश देणारा सुंदर देखावा कृषि विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्र विभागाच्या पुढाकाराने साकारण्यात आला. या देखाव्यासमोर गणरायाची भक्तिमय आरती करण्यात आली. याप्रसंगी रवी मिद्दलवार यांनी विद्यार्थ्यांना बोधप्रद कथा सांगत कोणतेही यश मिळविण्यासाठी मेहनत, सातत्य आणि चिकाटीला पर्याय नसतो, असा प्रेरणादायी संदेश दिला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्ती, संस्कार आणि बीजसंवर्धनाचा सामाजिक संदेश देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला. भारताचे पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एक विशेष भाग म्हणून १ ‘आशीर्वाद का दिया’ हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande