
आमदार जितेश अंतापुरकर यांच्या हस्ते विकासकामाचे उद्घाटन
नांदेड, 18 सप्टेंबर (हिं.स.) : बिलोली तालुक्यातील मौजे कौठा येथे ३० लाख रुपयांच्या निधीतून करण्यात आलेल्या सीसी रस्त्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा भारतीय जनता पक्षाचे आमदार जितेश अंतापुरकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
या रस्त्याच्या निर्मितीमुळे गावातील नागरिकांची दळणवळणाची सुविधा अधिक सुलभ होणार असून, गावातील मूलभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळणार आहे. रस्त्यामुळे नागरिकांना दैनंदिन प्रवास करताना होणाऱ्या अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.
लोकार्पण सोहळ्यास बिलोली तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावागावांत विकासाची कामे पोहोचविण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असून, मतदारसंघातील विकासाची ही वाटचाल अविरत सुरू राहील, असे आमदार जितेश अंतापुरकर यांनी यावेळी सांगितले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis