राजन पाटील-राजेंद्र राऊत भेटीने सोलापुरात राजकीय हालचालींना वेग
सोलापूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष तथा मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी विधान पर
Jkd


सोलापूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष तथा मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत यांची त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी राऊत यांनी राजन पाटील यांचा सत्कार करून स्वागत केले. दोन्ही नेत्यांमध्ये डीसीसी बँकेच्या आगामी निवडणुकीबाबत चर्चा झाली.

राजन पाटील यांचा गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर डीसीसी बँकेच्या राजकारणात महत्त्वाचा सहभाग राहिला आहे. त्यांनी बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. मात्र, बदललेल्या सहकार कायद्यातील तरतुदींमुळे आगामी डीसीसी निवडणूक राजन पाटील यांना लढविता येणार नसल्याची चर्चा सहकार क्षेत्रात सुरू आहे. त्यामुळे पाटील कुटुंबातून बँकेच्या राजकारणात पुढील नेतृत्व कोण करणार, याकडे लक्ष लागले आहे.

या पार्श्वभूमीवर लोकनेते साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळराजे पाटील यांचे नाव संभाव्य उत्तराधिकारी म्हणून चर्चेत आले आहे. त्यामुळे राजन पाटील आणि राजेंद्र राऊत यांची झालेली भेट तसेच डीसीसी निवडणुकीवर झालेली चर्चा याला सहकार क्षेत्रात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande