केज तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा रमेश आडसकर
बीड, 18 सप्टेंबर (हिं.स.)। केज तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने आणि पावसातील दीर्घ खंडामुळे खरीपातील सर्व पिके करपून गेली आहेत. त्यातच कृषी वीज खंडित होत असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. तालुक्यातील नदी, विहीर व तलावांमध्ये पाणीसाठा शिल्लक
रमेश आडसकर


बीड, 18 सप्टेंबर (हिं.स.)।

केज तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने आणि पावसातील दीर्घ खंडामुळे खरीपातील सर्व पिके करपून गेली आहेत. त्यातच कृषी वीज खंडित होत असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. तालुक्यातील नदी, विहीर व तलावांमध्ये पाणीसाठा शिल्लक नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून पशुधनासाठी चारा व पाणी उपलब्ध नसल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था पार कोलमडली आहे. या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन केज तालुका त्वरित 'कोरडा दुष्काळ' म्हणून

जाहीर करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन केजचे तहसीलदार यांना सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे शासनाने शेतकऱ्यांसाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यात जाचक अटी न लावता पंचनामे करून सरसकट आर्थिक मदत व भरीव अनुदान जाहीर करावे, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात आणि मजुरांच्या उपजीविकेसाठी म.न.रे.गा.ची कामे तात्काळ सुरू करण्यात यावीत, अशा मागण्या मांडण्यात आल्या आहेत. याशिवाय सन 2026-2027 मधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक शुल्क माफ करावे, मागील खरीप

हंगामातील प्रलंबित पिक विमा मंजूर करावा, टंचाईग्रस्त गावांना टँकर उपलब्ध करून द्यावेत आणि महावितरणने शेती व घरगुती वीज बिल भरण्याचा तगादा लावू नये, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवून परिसरातील शेतकरी, शेतमजूर व पशुधनाला तात्काळ दिलासा द्यावा, अशी विनंती रमेश आडसकर, अमर पाटील, नंदकुमार मोराळे, सांगळे चंद्रकांत, सुशील अंधारे, अरुण धपाटे यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी स्वाक्षऱ्यांद्वारे केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande