वडोद बाजारच्या श्रीविष्णू मंदिरासाठी ५ लाखांची देणगी
आमदार अब्दुल सत्तार यांचा पुढाकार; मंदिर विश्वस्तांकडे धनादेश सुपूर्द छत्रपती संभाजीनगर, 18 सप्टेंबर (हिं.स.) : सिल्लोड तालुक्यातील वडोद बाजार येथील श्रीविष्णू मंदिराच्या सुरू असलेल्या बांधकामासाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून एकूण ५ ला
अ


आमदार अब्दुल सत्तार यांचा पुढाकार; मंदिर विश्वस्तांकडे धनादेश सुपूर्द

छत्रपती संभाजीनगर, 18 सप्टेंबर (हिं.स.) : सिल्लोड तालुक्यातील वडोद बाजार येथील श्रीविष्णू मंदिराच्या सुरू असलेल्या बांधकामासाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून एकूण ५ लाख रुपयांची देणगी देण्यात आली. मंदिराच्या बांधकामस्थळी प्रत्यक्ष जाऊन ही देणगी विश्वस्तांकडे सुपूर्द करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी आमदार अब्दुल सत्तार यांनी श्रीविष्णू मंदिराच्या सुरू असलेल्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. यावेळी मंदिराचे विश्वस्त व ग्रामस्थांशी चर्चा करताना त्यांनी मंदिराच्या बांधकामासाठी आर्थिक मदत करण्याची ग्वाही दिली होती. दिलेला शब्द पूर्ण करत त्यांच्या वतीने २ लाख रुपये, जिल्हा परिषद सदस्य राधाकिसन पठाडे यांच्या वतीने दीड लाख रुपये आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अनिल बोरसे यांच्या वतीने दीड लाख रुपये, अशी एकूण ५ लाख रुपयांची देणगी मंदिर विश्वस्तांकडे सुपूर्द करण्यात आली.

मंदिराच्या बांधकामस्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहून देणगी सुपूर्द करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने ग्रामस्थांनी याबाबत समाधान व्यक्त केले. मंदिराच्या बांधकामाची पाहणी करून मदतीची ग्वाही देणे आणि त्यानंतर दिलेल्या शब्दाची पूर्तता करणे, या माध्यमातून मंदिराच्या उभारणीस हातभार लावता आल्याचा आनंद असल्याचे आमदार सत्तार यांनी सांगितले.श्रीविष्णू मंदिराचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण होऊन भाविकांसाठी हे श्रद्धास्थान अधिक सुंदर स्वरूपात साकारावे, यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande