जनतेच्या सुख-समृद्धीसाठी आ.संजय बनसोडेंचे गणरायाच्या चरणी साकडे
लातूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। : गणेशोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त उदगीर शहर व परिसरातील विविध गणेश मंडळांना माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी भेटी देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते विविध गणेश मंडळांमध्ये आरती करण्यात आली. त
संजय बनसोडे


लातूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। : गणेशोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त उदगीर शहर व परिसरातील विविध गणेश मंडळांना माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी भेटी देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते विविध गणेश मंडळांमध्ये आरती करण्यात आली. तसेच उदगीर मतदारसंघातील जनतेच्या सुख-समृद्धी, आरोग्य, समाधान आणि उज्ज्वल भविष्यासाठी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.

गणेशोत्सव हा सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव आहे. या उत्सवाच्या निमित्ताने आमदार संजय बनसोडे यांनी शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देवुन गणरायाचे दर्शन घेतले. मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी गणेश मंडळांच्या वतीने आमदार संजय बनसोडे यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे, उदगीरच्या नगराध्यक्षा स्वाती हुडे, उपनगराध्यक्षा शितल शिंदे, जि.प. चे बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिरादार, गटनेते प्रा.दिलीप मटके, जि.प. सदस्य डाॅ.दिपक सोमवंशी, बालाजी भोसले,वसंत पाटील, शशिकांत बनसोडे, शिवकुमार कांबळे, आकाश सागर, विठ्ठल चव्हाण, संग्राम हासुळे पाटील, ज्ञानेश्वर पाटील दावणगावकर, अजय तोडकर आदी उपस्थित होते.

उदगीर व जळकोट मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदो, प्रत्येक कुटुंबाला आरोग्य व समाधान लाभो, तसेच परिसराचा सर्वांगीण विकास साधला जावा, या वर्षी पाऊस कमी झाल्याने येत्या काळात मोठा पाऊस पडावा यासाठी आमदार संजय बनसोडे यांनी श्री गणरायाच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, विविध गणेश मंडळांच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या भेटीदरम्यान गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande