रत्नागिरी : साखरपा एसटी बसस्थानकातून अडीच लाखाचे मंगळसूत्र लंपास
रत्नागिरी, 18 सप्टेंबर (हिं.स.) । साखरपा बसस्थानकात बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने महिलेच्या खांद्याला लावलेल्या पर्समधील छोट्या पाकिटातून सोन्याचे मंगळसूत्र व अंगठी असा तब्बल २ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी देवरूख पोलीस ठाण्
रत्नागिरी : साखरपा एसटी बसस्थानकातून अडीच लाखाचे मंगळसूत्र लंपास


रत्नागिरी, 18 सप्टेंबर (हिं.स.) । साखरपा बसस्थानकात बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने महिलेच्या खांद्याला लावलेल्या पर्समधील छोट्या पाकिटातून सोन्याचे मंगळसूत्र व अंगठी असा तब्बल २ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

याप्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनीता विकास अवसरे (वय ४८, व्यवसाय गृहिणी, सध्या रा. परळ, मुंबई; मूळ रा. प्रभानवल्ली, वाणेवाडी, ता. लांजा) या आपल्या पतीसह अंत्रवली, ता. संगमेश्वर येथे जाण्यासाठी १६ सप्टेंबर रोजी सकाळी साखरपा बसस्थानकात आल्या होत्या. कोल्हापूर ते संगमेश्वरमार्गे चिपळूण जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील छोट्या पाकिटावर डल्ला मारला. यामध्ये अंदाजे पाच तोळे वजनाचे, सुमारे २ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि सुमारे साडेतीन ग्रॅम वजनाची १५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी होती. ती चोरीस गेली.

घटनेनंतर अवसरे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल करता आली नाही. त्यानंतर त्यांनी काल, १७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता देवरूख पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande