पाकिस्तानच्या कोहाटमध्ये मशिदीजवळ नमाजादरम्यान भीषण स्फोट; १५ जणांचा मृत्यू , ५० हून अधिक जखमी
इस्लामाबाद , 18 सप्टेंबर (हिं.स.)।पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वामधील कोहाट जिल्ह्यातील पोलिस लाइन्स परिसरात शुक्रवारी एका मशिदीजवळ झालेल्या स्फोटात किमान १५ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जिल्हा मुख्यालय (डीएचक्यू) र
पाकिस्तानच्या कोहाटमध्ये मशिदीजवळ नमाजादरम्यान भीषण स्फोट; १५ जणांचा मृत्यू , ५० हून अधिक जखमी


इस्लामाबाद , 18 सप्टेंबर (हिं.स.)।पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वामधील कोहाट जिल्ह्यातील पोलिस लाइन्स परिसरात शुक्रवारी एका मशिदीजवळ झालेल्या स्फोटात किमान १५ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जिल्हा मुख्यालय (डीएचक्यू) रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक (एमएस) ताहिर अली शाह यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, स्फोटानंतर रुग्णालयात १५ मृतदेह आणि ५० हून अधिक जखमींना आणण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारच्या नमाजदरम्यान हा स्फोट झाला. स्फोटामुळे मशिदीच्या बाहेर मोठा खड्डा पडला. जखमींमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, स्फोटामुळे मशिदीचा बाहेरील भाग मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाला असून एक भिंतही कोसळली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळी बचावकार्य सुरू होते. दरम्यान, घटनेनंतर कोहाट-हंगू मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात आणले जात असल्याने कोहाटमधील डीएचक्यू रुग्णालय प्रशासनाने आपत्कालीन स्थिती लागू केली आहे.प्राथमिक अहवालानुसार, स्फोटकांनी भरलेले एक वाहन ओल्ड पोलिस लाइन्स परिसरात घुसवण्यात आले होते. मात्र, स्फोटामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रेस्क्यू ११२२ चे प्रवक्ते बिलाल अहमद फैजी यांनी एका निवेदनात सांगितले की, स्फोटानंतर सशस्त्र दहशतवाद्यांशी गोळीबार झाला. आयजी हमीद यांनी सांगितले, “केपी पोलिस दहशतवादाविरोधात मजबूत भिंतीप्रमाणे उभे आहेत. भ्याड हल्ले आमचे मनोबल खच्ची करू शकत नाहीत.”निवेदनात त्यांच्या हवाल्याने पुढे म्हटले आहे की, “शहीदांचे रक्त व्यर्थ जाणार नाही. दहशतवादी आणि त्यांच्या मदतनीसांना अतिशय कठोर आणि इतरांसाठी उदाहरण ठरेल अशी शिक्षा भोगावी लागेल.” जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande