मूडीजने भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज सात टक्क्यांपर्यंत वाढवला
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर (हिं.स.)। पश्चिम आशियात सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जागतिक धक्क्यांनंतरही भारतीय अर्थव्यवस्थेने मजबुती दाखवली आहे. जागतिक रेटिंग एजन्सी मूडीज रेटिंग्सने चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पाद
Moodys raises Indias GDP growth forecast


नवी दिल्ली, 18 सप्टेंबर (हिं.स.)। पश्चिम आशियात सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जागतिक धक्क्यांनंतरही भारतीय अर्थव्यवस्थेने मजबुती दाखवली आहे. जागतिक रेटिंग एजन्सी मूडीज रेटिंग्सने चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) वाढीचा अंदाज सहा टक्क्यांवरून वाढवून सात टक्के केला आहे. एजन्सीने त्याचवेळी तेलाच्या वाढलेल्या किमती आणि अल निनोच्या प्रभावामुळे महागाई वाढण्याच्या जोखमीबाबत सावध केले आहे.

रेटिंग एजन्सीने शुक्रवारी जारी केलेल्या आपल्या ताज्या अंदाजात म्हटले आहे की, २०२६च्या पहिल्या तिमाहीत वार्षिक आधारावर भारताच्या वास्तविक जीडीपीची वाढ ८.२ टक्के राहिली, तर २०२५मध्ये ती ७.३ टक्के होती. मजबूत खासगी उपभोग, गुंतवणूक, पायाभूत सुविधांवर सरकारकडून सातत्याने केला जाणारा खर्च, सेवा क्षेत्राची मजबुती आणि खासगी गुंतवणुकीतील वाढ यामुळे ही कामगिरी शक्य झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला जपानच्या क्रेडिट रेटिंग एजन्सी ‘जेसीआर’ने भारताचे रेटिंग वाढवून ‘ए-’ केले होते. मजबूत आर्थिक वाढ आणि मजबूत वित्तीय व्यवस्थेचा हवाला देत ३५ वर्षांच्या अंतरानंतर ही कामगिरी झाली होती.

रेटिंग एजन्सीने म्हटले आहे की, पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक धक्क्यांप्रति अर्थव्यवस्थेने दाखवलेल्या मजबुतीमुळे आम्ही ३१ मार्च २०२७ रोजी समाप्त होणाऱ्या आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील वास्तविक जीडीपी वाढीचा अंदाज यापूर्वीच्या सहा टक्क्यांवरून वाढवून सात टक्के केला आहे.

एजन्सीने सांगितले की, जीडीपी वाढीच्या अंदाजातील ही सुधारणा पश्चिम आशियात सुरू असलेल्या संकटामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेची मजबुती दर्शवते. एजन्सीचा हा अंदाज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, एसअँडपी आणि फिच यांच्या अंदाजापेक्षा अधिक आहे. भारत सर्व इतर जी-२० अर्थव्यवस्थांच्या तुलनेत वेगाने वाढत राहील, अशी आशाही रेटिंग एजन्सीने व्यक्त केली आहे. चालू आर्थिक वर्ष २०२६-२७च्या एप्रिल-जून या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था ७.८ टक्के दराने वाढली आहे. ही वाढ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सात टक्के जीडीपी वाढीच्या अंदाजापेक्षा अधिक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande