खासदार गोपछडेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट
नांदेड, 18 सप्टेंबर (हिं.स.)। राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू नांदेड जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी यांची राष्ट्रपती भवन येथे जाऊन राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू सदिच्छा भेट घेतली. ''विकसित भारत'' आणि '
अ


नांदेड, 18 सप्टेंबर (हिं.स.)। राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू नांदेड जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी यांची राष्ट्रपती भवन येथे जाऊन राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू सदिच्छा भेट घेतली. 'विकसित भारत' आणि 'अंत्योदय' या संकल्पनेनुसार त्यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन बहुमोल मार्गदर्शन प्राप्त केले. या वेळी महाराष्ट्रातील जनजातीय व दुर्गम भागातील विद्यार्थिनींच्या उत्कृष्ट शिक्षण, आरोग्य सुविधा आणि सर्वांगीण विकासाबाबत सविस्तर चर्चा झाली.डिजिटल शिक्षण आणि 'आयुष्मान भारत' सारख्या कल्याणकारी योजनांचा लाभ अंतिम घटकापर्यंत पारदर्शकपणे पोहोचवून 'विकसित भारत २०४७' चे ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही निरंतर कटिबद्ध असल्याचे डॉ गोपछडे यांनी सांगितले.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande