
आमदार जितेश अंतापुरकर यांच्या हस्ते ४० लाखांच्या निधीतून कामाचे लोकार्पण
नांदेड, 18 सप्टेंबर (हिं.स.) : बिलोली तालुक्यातील रा.मा. तोरणा–खपराळा–गुजरी ते दिग्रस या रस्त्याच्या सुधारणा कामाचे ४० लाख रुपयांच्या निधीतून आमदार जितेश अंतापुरकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
या रस्त्याच्या सुधारणेमुळे परिसरातील नागरिकांची दळणवळणाची सुविधा अधिक सुलभ होण्यास मदत होणार असून, वाहतूक व्यवस्था सुधारण्यासोबतच परिसराच्या विकासालाही चालना मिळणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असल्याने रस्ता सुधारणा कामामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
यावेळी बिलोली तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतदारसंघातील विकासकामांना सातत्याने गती देत असून, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार जितेश अंतापुरकर यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचे त्यांनी आभार मानले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis