देगलूरमध्ये ७१ लाख रुपये निधीच्या सीसी रस्ते बांधकामाचे भूमिपूजन
नांदेड, 18 सप्टेंबर (हिं.स.)।देगलूर शहरातील प्रभाग क्र. १२ मध्ये डीपीडीसी सन २०२५–२०२६ अंतर्गत एकूण ७१ लाख रुपये निधीच्या सीसी रस्ते बांधकामाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार जितेश अंतापुरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. देगलूर तालुक्यातील विव
क


नांदेड, 18 सप्टेंबर (हिं.स.)।देगलूर शहरातील प्रभाग क्र. १२ मध्ये डीपीडीसी सन २०२५–२०२६ अंतर्गत एकूण ७१ लाख रुपये निधीच्या सीसी रस्ते बांधकामाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार जितेश अंतापुरकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

देगलूर तालुक्यातील विविध प्रश्नांच्या संदर्भात निश्चित पणाने मार्ग काढण्यात येईल असे आमदारांनी सांगितले विशेष म्हणजे विधानसभा मतदारसंघाचा विकास करणारा असल्याचे ते म्हणाले यामध्ये श्री वाल्मिक मंदिर परिसर तसेच रामपूर रोड ते श्री दापकेकर यांच्या घरापासून शिवनेरी नगर परिसरापर्यंत ५० लाख रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या सीसी रस्ता बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.

--------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande