पुणे अंतर्गत रिंगरोडच्या भूसंपादनाला वेग; तीन-चार महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन
पुणे, 18 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उतारा ठरणाऱ्या ८३.१२ किलोमीटर लांबीच्या अंतर्गत रिंगरोडच्या कामातील महत्त्वाचा टप्पा आता वेगाने पुढे सरकत आहे. रिंगरोडच्या मार्गातील जमीन ताब्यात घेण्यासाठीची भूसंपादन प्रक्रिया गतीने सुरू
Ring Road Pune


पुणे, 18 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उतारा ठरणाऱ्या ८३.१२ किलोमीटर लांबीच्या अंतर्गत रिंगरोडच्या कामातील महत्त्वाचा टप्पा आता वेगाने पुढे सरकत आहे. रिंगरोडच्या मार्गातील जमीन ताब्यात घेण्यासाठीची भूसंपादन प्रक्रिया गतीने सुरू करण्यात आली असून, महापालिका हद्दीतील २१ गावांपैकी आठ गावांतील ३९ हेक्टर जमिनीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत.यापैकी काही गावांमध्ये संयुक्त मोजणी आणि मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित गावांचे प्रस्तावही लवकरच तयार करण्यात येणार असून, पुढील तीन ते चार महिन्यांत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

त्यामुळे रिंगरोडच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महापालिका हद्दीतील भूसंपादनासाठी १ हजार ८८ कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. प्रस्तावित अंतर्गत रिंगरोडसाठी एकूण ४४ गावांमधील ७३४.९० हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे.यामध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील २१ गावांमधील ३६४.८४ हेक्टर, पुणे महापालिका हद्दीतील २१ गावांमधील ३३२.०२ हेक्टर आणि फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषद हद्दीतील दोन गावांमधील ३६.४८ हेक्टर जमिनीचा समावेश आहे.भूसंपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास रिंगरोडच्या प्रत्यक्ष कामाला गती मिळण्याची शक्यता आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande