लावाने बोल्ड एन४ प्रो ५जी स्मार्टफोन केला लॉन्च
मुंबई, 19 सप्टेंबर (हिं.स.)। लावाने आपल्या ‘बोल्ड’ मालिकेत नवीन स्मार्टफोन ‘लावा बोल्ड एन४ प्रो ५जी’ लॉन्च केला आहे. ऑगस्टमध्ये लॉन्च झालेल्या ‘बोल्ड एन४ लाईट’चे हे अपग्रेडेड व्हर्जन आहे. नव्या फोनमध्ये ५जी कनेक्टिव्हिटी, मोठी बॅटरी आणि सुधारित हार
Lava Launches Bold N4 Pro 5G Smartphone


मुंबई, 19 सप्टेंबर (हिं.स.)। लावाने आपल्या ‘बोल्ड’ मालिकेत नवीन स्मार्टफोन ‘लावा बोल्ड एन४ प्रो ५जी’ लॉन्च केला आहे. ऑगस्टमध्ये लॉन्च झालेल्या ‘बोल्ड एन४ लाईट’चे हे अपग्रेडेड व्हर्जन आहे. नव्या फोनमध्ये ५जी कनेक्टिव्हिटी, मोठी बॅटरी आणि सुधारित हार्डवेअर देण्यात आले असून, त्याची लॉन्च किंमत १३ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत कंपनीने दिलेल्या विविध ऑफर्सचा समावेश करून आहे.

लावा बोल्ड एन४ प्रो ५जीच्या मागील बाजूस फ्लॅट पॅनल देण्यात आले आहे. वरच्या डाव्या बाजूला गोल-आयताकृती आकाराचा कॅमेरा मॉड्यूल असून, त्यात दोन मोठे कॅमेरा लेन्स, एक छोटा गोलाकार घटक आणि एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. फोनचा फ्रेमदेखील फ्लॅट असून, उजव्या बाजूला पॉवर आणि व्हॉल्यूम बटणे देण्यात आली आहेत. पुढील बाजूस सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये ६.७५ इंचांची एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आली असून, ती १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. फोनमध्ये युनिसॉक टी८२०० ५जी चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. यासोबत ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते. तसेच ६ जीबी व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने रॅमची क्षमता १२ जीबीपर्यंत वाढवता येते. हा फोन अँड्रॉइड १६ आधारित ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार, फोनमध्ये क्लीन आणि स्मूद सॉफ्टवेअर अनुभव मिळणार आहे.

कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास, फोनच्या मागील बाजूस ५० मेगापिक्सेलचा एआय ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी ६ हजार एमएएच क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. मात्र, फोनच्या चार्जिंग स्पीडबाबत कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही. धूळ आणि पाण्याच्या हलक्या संपर्कापासून संरक्षणासाठी फोनला आयपी६४ रेटिंग मिळाले आहे.

लावा बोल्ड एन४ प्रो ५जीचा सध्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेला एकच व्हेरिएंट उपलब्ध करण्यात आला आहे. हा फोन २६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. याशिवाय, लावाकडून ग्राहकांना घरपोच मोफत सर्व्हिस सपोर्ट देण्यात येणार आहे. फोनमध्ये काही बिघाड झाल्यास कंपनीकडून घरपोच दुरुस्तीची सुविधा दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande