न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का, अष्टपैलू क्रिकेटपटू रचिन रविंद्र दुखापतग्रस्त
नवी दिल्ली, १९ सप्टेंबर (हिं.स.):भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात पाच टी-२०, पाच एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका टीम इंडिया खेळणार आहे. या दौऱ्यापूर्वी यजमान न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. न्
रचिन रविंद्र


नवी दिल्ली, १९ सप्टेंबर (हिं.स.):भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात पाच टी-२०, पाच एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका टीम इंडिया खेळणार आहे. या दौऱ्यापूर्वी यजमान न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू रचिन रविंद्र ऑकलंडमध्ये एका प्रमोशनल शूटदरम्यान डायव्हिंग कॅच घेण्याच्या प्रयत्नात नुकताच उजव्या खांद्याला जखमी झाला आहे.

१८ सप्टेंबर रोजी वैद्यकीय तज्ञांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत कोणतीही गंभीर दुखापत दिसून आली नाही, परंतु रवींद्रचे क्रिकेटमधील पुनरागमन पुनर्वसनाच्या पहिल्या काही आठवड्यांतील त्याच्या प्रगतीवर अवलंबून असेल. २२ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत रवींद्र खेळेल की नाही, हे सध्या अस्पष्ट आहे.

न्यूझीलंड पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर म्हणाले, पुढील सहा महिन्यांत कसोटी क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक असल्यामुळे, आम्ही रचिनला गरजेपेक्षा लवकर परत आणण्याची घाई करू इच्छित नाही. त्याचे पुनर्वसन खूप चांगले झाले आहे आणि आम्ही लवकरच त्याचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिका २२ ऑक्टोबरला सुरू होत असून, त्यासाठी आता फक्त एक महिना शिल्लक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande