‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड; पुण्यातील कुटुंबाचाही समावेश
पुणे, 19 सप्टेंबर (हिं.स.)। सांस्कृतिक कार्य विभागाच्या ‘घरोघरी बाप्पा’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्राचे डिजिटल सांस्कृतिक संग्रह पोर्टल असलेल्या ‘Bappa.org’ वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातील नव्या घरातील
fgdf


पुणे, 19 सप्टेंबर (हिं.स.)। सांस्कृतिक कार्य विभागाच्या ‘घरोघरी बाप्पा’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्राचे डिजिटल सांस्कृतिक संग्रह पोर्टल असलेल्या ‘Bappa.org’ वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातील नव्या घरातील पहिला गणेशोत्सव, कोकणातील पारंपरिक गौरी-गणपती उत्सव, घरच्या घरी साकारलेली मातीची गणेशमूर्ती, व्हिएतनाममधील विद्यार्थ्यांचा गणेशोत्सव आणि विसर्जनाच्या मातीतून वृक्षसंवर्धन अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.

या उपक्रमातून राज्यातील घरोघरी साजरा होणारा गणेशोत्सव, स्थानिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, ऐतिहासिक मंदिरे तसेच परदेशातील भारतीय समुदायांच्या उत्सवांच्या आठवणींचे डिजिटल जतन केले जात आहे. गणेशोत्सवाशी संबंधित छायाचित्रे आणि माहिती पोर्टलवर सादर करणाऱ्या नागरिक, मंडळ किंवा मंदिर न्यासाला महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत ‘डिजिटल सांस्कृतिक संवर्धक प्रमाणपत्र’ देण्यात येते. पोर्टलवर नोंदविण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कथांची दररोज निवड करून शासनाच्या माध्यमातून त्यांना प्रसिद्धी दिली जात आहे.

दरवर्षी गणेशोत्सवासाठी मूळ गावी जाणाऱ्या संजय मंगलाराम यांच्या कुटुंबाने यंदा पुण्यातील नव्या घरात प्रथमच गणरायाचे स्वागत केले. कुटुंबातील दोन लहान मुलींनी दैनंदिन पूजा आणि आरतीचे नेतृत्व केले. नव्या पिढीकडे गणेशोत्सवाच्या परंपरेचा वारसा सोपविणाऱ्या या कौटुंबिक उत्सवाची वैशिष्ट्यपूर्ण नोंद म्हणून निवड करण्यात आली आहे.

कोकणातील गुहागर परिसरातील गौरी-गणपतीची पारंपरिक प्रथाही या निवडीत आहे. महिला डोक्यावर पारंपरिक पितळी ताटामध्ये गौरीची मूर्ती, पूजेचे नारळ आणि रानातील तेरड्याचे देठ घेऊन हिरव्यागार भातशेतीतून आणि गावातील पाणवाटांमधून सामूहिकरित्या मार्गक्रमण करतात. शेती, निसर्ग, स्त्रीशक्ती आणि पूर्वजांच्या परंपरेशी असलेले नाते अधोरेखित करणाऱ्या या प्रथेचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे.

निकिता जे. पांचाळ यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत घरच्या घरी मातीची गणेशमूर्ती साकारली. त्यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बाजारातील मूर्ती तसेच कृत्रिम रंगांचा वापर टाळून कच्च्या मातीपासून मूर्ती घडविली आणि स्वतः रंगकाम केले. पारंपरिक मातीकलेचे जतन करण्यासोबतच पर्यावरणपूरक उत्सवाची संकल्पना प्रत्यक्षात आणणारा हा उपक्रम वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande