परळी विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
बीड, 02 सप्टेंबर (हिं.स.)। “मतदारांनी आपले नाव, पत्ता व इतर तपशील तपासून आवश्यक असल्यास तात्काळ अर्ज करावा” — उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर* * SIR पुनरिक्षणात ४० हजार २६० मतदार कमी ; ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करा भारत निवडणूक आय
प्रारूप मतदार यादी


बीड, 02 सप्टेंबर (हिं.स.)।

“मतदारांनी आपले नाव, पत्ता व इतर तपशील तपासून आवश्यक असल्यास तात्काळ अर्ज करावा” — उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर*

* SIR पुनरिक्षणात ४० हजार २६० मतदार कमी ; ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करा

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण अंतर्गत परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराने प्रारूप मतदार यादीत आपले नाव, पत्ता, मतदान केंद्र व इतर तपशील काळजीपूर्वक तपासावेत. पात्र असूनही नाव यादीत नसल्यास अथवा नाव, पत्ता किंवा इतर तपशिलात त्रुटी असल्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल कराव्यात. “मतदारांनी आपले नाव, पत्ता व इतर तपशील तपासून आवश्यक असल्यास तात्काळ अर्ज करावा” असे आवाहन उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने सूचित केल्यानुसार २३३ परळी विधानसभा मतदारसंघातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष पुनर्परीक्षण कार्यक्रमापूर्वी परळी विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख २७ हजार ३४४ मतदार होते. विशेष पुनर्परीक्षण कार्यक्रमानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये आता २ लाख ८७ हजार १०१ मतदार असल्याचे तहसील कार्यालय, परळी (निवडणूक विभाग) यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून स्पष्ट झाले आहे. विशेष पुनर्परीक्षण कार्यक्रमांतर्गत मृत व्यक्ती ८ हजार ८३, कायमस्वरूपी स्थलांतरित २१ हजार १७२, दुबार मतदार ५ हजार १३३, अनुपस्थित मतदार ५ हजार ७८९ व इतर ८३, असे एकूण ४० हजार २६० मतदार कमी झाले आहेत. तसेच मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करताना विशेष पुनर्परीक्षण कार्यक्रमापूर्वी एकूण ३६३ मतदान केंद्रे होती. SIR नंतर मतदान केंद्र क्रमांक २९, १२९, १३१, १३७, १३८, १४८, १५५, १७५, १८८, ३५१ व ३५९ ही मतदान केंद्रे कमी करण्यात आली आहेत. याशिवाय २३३ मतदान केंद्रांमध्ये १ नवीन मतदान केंद्र तयार करण्यात आले असून, आता एकूण ३५३ मतदान केंद्रे झाली आहेत.

दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत मतदारांना दावे व हरकती घेता येणार असून, या कालावधीत नवीन मतदार म्हणून नाव नोंदणी तसेच नावातील दुरुस्ती करता येणार आहे. तर ३१ ऑगस्ट २०२६ ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आलेल्या दावे व हरकतींवर सुनावणी घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाने २३३ परळी विधानसभा मतदारसंघातील मतदारांना मदत करण्यासाठी १५ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त केले असून, त्यांच्यामार्फत दावे व हरकतींवर सुनावणी घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.

३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही, हे नागरिकांना आपल्या नजीकच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे (BLO) पाहता येणार आहे. तसेच सदर प्रारूप मतदार यादी भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत तपासून घ्यावे, तसेच नाव नसल्यास किंवा नाव, पत्ता अथवा इतर तपशिलात दुरुस्ती आवश्यक असल्यास विहित कालावधीत दावे व हरकती दाखल कराव्यात, असे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, परळी यांनी आवाहन केले आहे.

परळी विधानसभा मतदारसंघातील पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी आणि नाव नसल्यास विहित प्रक्रियेद्वारे तात्काळ अर्ज करावा, तसेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनीही Form-6 भरून मतदार यादीत नाव नोंदवावे, असे सांगण्यात आले आहे. दावे-हरकती व पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदाराने आपले नाव तपासून आवश्यक असल्यास ३० सप्टेंबरपूर्वी दावे अथवा हरकती दाखल कराव्यात, “प्रारूप मतदार यादीत प्रत्येक मतदाराने आपले नाव, पत्ता, मतदान केंद्र व इतर तपशील काळजीपूर्वक तपासावा. पात्र असूनही नाव यादीत नसल्यास किंवा नोंदीमध्ये काही त्रुटी असल्यास ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी दावे अथवा हरकती दाखल कराव्यात. १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनीही Form-6 भरून मतदार यादीत नाव नोंदवावे,” असे आवाहन उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांनी केले.

SIR नंतरची स्थिती

पूर्वीचे एकूण मतदार : ३,२७,३४४

प्रारूप यादीतील मतदार : २,८७,१०१

कमी झालेले मतदार : ४०,२६०

पूर्वीची मतदान केंद्रे : ३६३

कमी करण्यात आलेली केंद्रे : ११

नवीन मतदान केंद्र : १

आताची एकूण मतदान केंद्रे : ३५३

दावे व हरकतीचा कालावधी : ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande