सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार
जळगाव, 02 सप्टेंबर (हिं.स.) सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत असून, जळगावच्या सराफ बाजारात सलग तिसऱ्या दिवशी दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळा 4 हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रति किलो 9 हजार
सोनं


जळगाव, 02 सप्टेंबर (हिं.स.) सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत असून, जळगावच्या सराफ बाजारात सलग तिसऱ्या दिवशी दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळा 4 हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रति किलो 9 हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात आज प्रति तोळा 4 हजार रुपयांची घट झाली. त्यामुळे सोन्याचा सध्याचा दर 1 लाख 55 हजार रुपये प्रति तोळा झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून दरवाढीनंतर आता सलग घसरण सुरू झाल्याने बाजारातील हालचालींकडे ग्राहक आणि गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात प्रति किलो 9 हजार रुपयांची घट झाली असून, आजचा दर 2 लाख 38 हजार रुपये प्रति किलो इतका आहे. अल्पावधीत झालेल्या या घसरणीमुळे चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande