मुंबई-अमरावती विमानसेवा ४ ऑक्टोबरपासून पुन्हा पाच दिवस
प्रवाशांना दिलासा : वेळेत बदल नाही अमरावती, 02 सप्टेंबर (हिं.स.)। अलायन्स एअर कंपनीची मुंबई-अमरावती-मुंबई ही विमानसेवा पुन्हा एकदा आठवड्यातून पाच दिवस सुरू होणार आहे, पण त्यासाठी प्रवाशांना महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. येत्या ४ ऑक्टोबरपासून
मुंबई-अमरावती विमानसेवा ४ ऑक्टोबरपासून पुन्हा पाच दिवस


प्रवाशांना दिलासा : वेळेत बदल नाही

अमरावती, 02 सप्टेंबर (हिं.स.)। अलायन्स एअर कंपनीची मुंबई-अमरावती-मुंबई ही विमानसेवा पुन्हा एकदा आठवड्यातून पाच दिवस सुरू होणार आहे, पण त्यासाठी प्रवाशांना महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. येत्या ४ ऑक्टोबरपासून दर आठवड्याला पाच दिवस ही सेवा उपलब्ध होऊ शकेल.

अमरावतीच्या बेलोरा येथील विमानतळावरून मुंबई -अमरावती विमानसेवा १६ एप्रिल २०२५ पासून झाली होती. ही सेवा सुरूवातीला आठवड्यातून चार दिवस होती. पण, मे २०२६ पासून विमानसेवा चार वरून पाच दिवस करण्यात आली. या विमानसेवेला प्रवाशांचा प्रतिसाद आहे. पण, ही सेवा पुरवणाऱ्या अलायन्स एअर कंपनीने 'ऑपरेशनल' कारण दर्शवून ही सेवा पुन्हा चार दिवस करण्याचा निर्णय घेतला होता. हा बदल २५ ऑगस्टपासून झाला होता. सध्या दर आठवड्याला रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे चार दिवस मुंबई-अमरावती-मुंबई ही विमानसेवा सुरू आहे. ४ ऑक्टोबरपासून दर रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार असे पाच दिवस विमानसेवा उपलब्ध राहणार आहे. विमानाच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबई विमानतळावरून सकाळी ७.०५ वाजता विमान उड्डाण घेते आणि सकाळी ८.५० वाजता अमरावती विमानतळावर पोहचते. तर परतीच्या वेळी अमरावती विमानतळावरून सकाळी ९.१५ वाजता विमानोड्डाण होते आणि सकाळी ११ वाजता मुंबई विमानतळावर पोहचते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande