
मुंबई, 02 सप्टेंबर, (हिं.स.)। प्रणव कन्स्ट्रक्शन्स लिमिटेडचा आरंभिक सार्वजनिक निर्गम (आयपीओ) ०७ सप्टेंबरला खुला होणार आहे. यामध्ये गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार ०९ सप्टेंबरपर्यंत बोली लावू शकतात. यासाठी किंमत श्रेणी (प्राइस बँड) ११८–१२४ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.
कंपनीने बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, प्रणव कन्स्ट्रक्शन्स लिमिटेडचा आयपीओ ०७ सप्टेंबरला खुला होईल आणि ०९ सप्टेंबरला बंद होईल. यामध्ये गुंतवणुकीसाठी अँकर गुंतवणूकदार ४ सप्टेंबरला बोली लावू शकतात. कंपनीने यासाठी किंमत श्रेणी (प्राइस बँड) ११८–१२४ रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. प्रणव कन्स्ट्रक्शन्स लिमिटेडचा हा आयपीओ ३१५.६0 कोटी पर्यंतचा फ्रेश इश्यू आहे, ज्यामध्ये इन्व्हेस्टर शेअरहोल्डर-बायो ऊर्जा इंडिया इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडद्वारे एकूण २,८५६,८६९ इक्विटी शेअर्सच्या विक्रीचा प्रस्ताव (ओएफएस) देखील समाविष्ट आहे.
कंपनीनुसार, १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या या इश्यूमध्ये गुंतवणूकदार किमान १२० इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर १२० इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात. या शेअर्सचे एनएसई आणि बीएसई या दोन्ही ठिकाणी लिस्टिंग करण्याचा प्रस्ताव आहे. उल्लेखनीय आहे की, वर्ष २००३ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. ही कंपनी मुंबईतील टॉप रीडेव्हलपमेंट कंपन्यांपैकी एक आहे, जी मुख्यतः वेस्टर्न सबर्ब्समध्ये अफोर्डेबल, मिड आणि मास आणि अॅस्पिरेशनल घरांवर लक्ष केंद्रित करत रीडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स करते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule