मराठा आरक्षणासाठी बीड–परळी महामार्गावर रास्तारोको
बीड, 02 सप्टेंबर (हिं.स.)मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीड–परळी महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे. जरुड फाट्यावर आंदोलकांनी ठिय्या दिल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर पोलीस अलर्ट झाले असून, घट
आंदोलन


बीड, 02 सप्टेंबर (हिं.स.)मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीड–परळी महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे. जरुड फाट्यावर आंदोलकांनी ठिय्या दिल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर पोलीस अलर्ट झाले असून, घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आंदोलनस्थळी दाखल होत आंदोलकांशी संवाद साधला. मराठा आरक्षणाच्या मागणीवर आंदोलक आक्रमक असून, रास्तारोकोमुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande