अमरावती जिल्हा परिषदेत सहा स्वीकृत सदस्यांची होणार नियुक्ती
जाचक निकषांमुळे इच्छुकांची संख्या घटली; तज्ज्ञांना संधी अमरावती, 02 सप्टेंबर (हिं.स.) | गेल्या साडेचार वर्षांपासून प्रशासकराज सुरू असलेल्या जिल्हा परिषदेत निवडणुकांबाबत अद्याप कोणतीही हालचाल नसली, तरी शासनाने स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी अधिसूचना
जि.प.  मध्ये सहा स्वीकृत सदस्यांची निवड होणार


जाचक निकषांमुळे इच्छुकांची संख्या घटली; तज्ज्ञांना संधी

अमरावती, 02 सप्टेंबर (हिं.स.) | गेल्या साडेचार वर्षांपासून प्रशासकराज सुरू असलेल्या जिल्हा परिषदेत निवडणुकांबाबत अद्याप कोणतीही हालचाल नसली, तरी शासनाने स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी अधिसूचना जारी केली आहे. जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या ५९ असल्याने सहा स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

स्वीकृत सदस्यांसाठी शासनाने निश्चित केलेले निकष कडक असल्याने अनेक राजकीय इच्छुक थेट रेसबाहेर पडले आहेत. त्यामुळे विविध क्षेत्रातील अनुभवी आणि जाणकार तज्ज्ञांची निवड होण्याची शक्यता आहे. प्रशासनाचा अनुभव असलेले स्थानिक रहिवासी तसेच किमान पाच वर्षांचा अनुभव असलेले डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, कृषी व जलसंधारण क्षेत्रातील तज्ज्ञ, सहकार क्षेत्रातील व्यक्ती, वकील, अभियंते, समाजसेवक, निवृत्त अधिकारी आणि एनजीओ पदाधिकारी पात्र ठरू शकतात. राजकीय पक्ष, गट किंवा आघाड्यांच्या संख्याबळानुसार योग्य व्यक्तींच्या नावांची शिफारस केली जाईल. सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर निवड झालेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध केली जातील.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande