उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवेदन
बीड, 02 सप्टेंबर, (हिं.स.)। केज विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण बीड जिल्ह्यात पावसाअभावी नुकसान झालेल्या खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करून प्रति हेक्टर ₹५०,००० आर्थिक मदत देण्यात यावी तसेच कोरडा दुष्काळ जाहीर करून आवश्यक दुष्काळाच्या सर्व उपाययोजना ला
निवेदन


बीड, 02 सप्टेंबर, (हिं.स.)। केज विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण बीड जिल्ह्यात पावसाअभावी नुकसान झालेल्या खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करून प्रति हेक्टर ₹५०,००० आर्थिक मदत देण्यात यावी तसेच कोरडा दुष्काळ जाहीर करून आवश्यक दुष्काळाच्या सर्व उपाययोजना लागू करण्याबाबत आज उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले असून, अनेक भागांमध्ये पिकांची वाढ खुंटली आहे तसेच पिके करपुन गेलेली आहेत. संपूर्ण बीड जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती व खरीप पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून दुष्काळ निवारणाच्या सर्व आवश्यक उपाययोजना तातडीने लागू करण्यात याव्यात. दुष्काळग्रस्त भागात पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच मजुरांच्या हाताला काम देण्यात यावे.

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून, त्यांच्या कृषी वीज बिलात सवलत देऊन थकीत वीज बिलाच्या वसुलीस तात्पुरती स्थगिती देण्यात यावी. तसेच दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडू नये व शेतीसाठी आवश्यक वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा. या परिस्थितीचा परिणाम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवरही होत आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी व परीक्षा शुल्क माफ करण्यात यावी.व शिष्यवृत्ती तसेच आवश्यक शैक्षणिक मदत उपलब्ध करून देण्यात यावी.

तसेच दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराच्या अतिरिक्त संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात. सद्यस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता या सर्व बाबींवर तातडीने सर्व उपाययोजना लागू करण्यात याव्या व तत्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पृथ्वीराज शिवाजीराव साठे (माजी आमदार केज विधानसभा) यांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande